SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इन्स्टाग्राम वर ‘ब्ल्यू टिक’ मिळविण्यासाठी नेमकं काय करायचं? जाणून घ्या..

सोशल मीडियामध्ये जवळपास पूर्ण जगच गुंतलं आहे. अशीच एक ट्विटर नावाची सोशल मीडिया कंपनी, ज्या कंपनीने (Twitter) ब्लू टिक (Blue Tick) या आगळ्यावेगळ्या वेरिफिकेशनची सुरुवात केली. याशिवाय इन्स्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक यावर (Facebook) सुरुवातीपासूनच अशा रिक्वेस्टचा पर्याय देण्यात आला आहे.

इन्स्टाग्रामवर Blue Badge अर्थात ब्लू टिकसाठी कसा अर्ज कराल..?

Advertisement

▪️ इन्स्टाग्रामवर Blue Tick वेरिफिकेशसाठी तुमच्या इन्स्टाग्राम सेटिंगमध्ये जा.

▪️ तेथे ‘अकाऊंट’ (Account) नावाचा ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करा.

Advertisement

▪️ तिथे टॅप केल्यानंतर एक लिस्ट दिसेल. याच लिस्टमध्ये ‘Request Verification’ पर्याय आहे.

▪️ तिथे सिलेक्ट केल्यानंतर वेरिफिकेश रिक्वेस्टचं पेज ओपन होईल म्हणजेच एक फॉर्म ओपन होईल.

Advertisement

▪️ या अर्जामध्ये तुमचं यूजर नेम दिसेल, त्याखाली तुमचं संपूर्ण नाव टाका.

▪️ यानंतर ‘known As’ पर्याय भरा.

Advertisement

मग त्याखाली कॅटेगरी नावाचा सिलेक्टेबल पर्याय दिसेल. तिथे तुमचं अकाऊंट कशासंबंधीत असेल त्यानुसार तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहात ते सिलेक्ट करा. News/Media, Sports, Government/Politics, Music, Fashion, Entertainment, Blogger/Influencer, Business/Brand/Organization
यांपैकी एक पर्याय निवडा. यांपैकी काही पर्याय निवडायचा नसेल, तर इतर (Other) हा पर्याय निवडावा.

सर्वात शेवटी तुमचा आयडी (ओळखपत्र) अपलोड करावा लागेल. सरकारी आयडी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट कॉपी द्यावी लागू शकते. त्यावर तुमचा फोटो, जन्मतारीख आणि संपूर्ण नाव असायला हवं.

Advertisement

त्यानंतर इन्स्टाग्राम तुमचं अकाऊंट रिव्ह्यू करेल. जर इन्स्टाग्रामला, तुम्ही वेरिफिकेशनसाठी पात्र असाल तर तुम्हाला Blue Badge मिळेल, अन्यथा मिळणार नाही.

लक्षात ठेवा की, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट वेरिफाय करुन देण्याचा अनेक जण दावा करतात. त्यासाठी ते पैशांची मागणीही करू शकतात. परंतु अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. जर अकाउंट वेरिफाय करण्याची इच्छा असेल, तर अधिकृतपणेच यासाठी रिक्वेस्ट करा, कोणालाही पैसे देऊ नका.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement