SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना कोरोना लसीसाठी स्पॉट रजिस्ट्रेशन, कोणती कागदपत्रे गरजेची? जाणून घ्या..

18 ते 44 वयोगटातील लोकं ऑनलाईन रजिस्ट्रेशनविना संबंधित सरकारी लसीकरण (Vaccination) केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. या लसीकरणाची सुरूवात 24 मे पासून झाली आहे. ऑनलाईन नेमणुकीच्या वेळी बर्‍याच ठिकाणी लसी वाया गेल्याच्या बातम्या समोर आल्या कारणाने हा निर्णय घेतला गेला आहे.

18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांसाठी स्पॉट रजिस्ट्रेशन

Advertisement

45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसारखी आता 18 ते 44 वर्षे वय असलेल्या लोकांसाठी देखील आता स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा देण्यात येत आहे. याआधी 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीसाठी स्पॉट नोंदणीची (Spot Registration) सुविधा नव्हती, अशा लोकांना कोविन पोर्टल (Cowin Portal), आरोग्य सेतु ॲप (Arogya Setu App) किंवा उमंग ॲपवर (Umang App) ऑनलाईन नोंदणी करावी लागत होती. यानंतर त्यांना ठराविक दिवशी लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यायला जावं लागतं.

असंही व्हायचं की, बहुतांश तरूण त्यांच्या जवळील लसीकरण केंद्राला बुक करण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा त्यांना त्यांचा स्लॉट बुक दाखवला जायचा किंवा तो स्लॉट दिसतच नसायचा. आधी तांत्रिक समस्या वाटली होती, पण नंतर लसीच्या अभावामुळे हे होत असत्याची माहीती समोर आली.

Advertisement

स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी काय करायचं?

45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांप्रमाणे आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना देखील स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा देण्यात येत आहे. तुम्हाला तुमचं ओळखपत्र म्हणून आधार कार्ड (Adhar Card), पासपोर्ट किंवा रेशन कार्ड सोबत आणावे लागेल आणि त्याची झेरॉक्स कॉपीसुद्धा सोबत ठेवावी लागेल.

Advertisement

महत्वाचं म्हणजे मोबाईल नंबरची आवश्यकता स्पॉट नोंदणीच्या वेळी लागते. कारण तुम्हाला लसीकरणाच्या अद्ययावत माहीतीसाठी त्यावर संबंधित मेसेज येतो. तुमचा मोबाईल तुमच्यासोबत असला म्हणजे ते कामही पूर्ण होईल. फक्त लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारीच तुमची नोंदणी करू शकतात आणि उपलब्धतेनुसार ही लस देतील.

ही सुविधा सध्या केवळ शासकीय लसीकरण केंद्रात उपलब्ध आहे. राज्यांच्या निर्णयानंतर तिथे ऑनसाईट किंवा ऑनस्पॉट रजिस्ट्रेशन आणि नियुक्तीची सुविधा उपलब्ध होईल.

Advertisement

लस घेण्याच्या नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे गरजेची?

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), पासपोर्ट, पेन्शन कागदपत्र, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, पॅन कार्ड (Pan Card) , बँक किंवा पोस्ट ऑफिसने दिलेला पासबुक, केंद्र / राज्य सरकार / सार्वजनिक क्षेत्र मर्यादित कंपन्यांनी जारी केलेले आयकार्ड इ. पैकी कागदपत्र लागतील.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement