Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम राहणार, पण निर्बंध शिथिल होणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

0

महाराष्ट्रात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र काही प्रमाणात निर्बंध शिथील करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कॅबिनेट मंत्रीमंडळाची आज (ता.27) बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री टोपे म्हणाले, की “राज्यातील लॉकडाउन सरसकट उठवण्याचा निर्णय झालेला नाही. मात्र, सध्याच्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता देण्याचा विचार आहे. यासंदर्भातील नियमावली येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे.”

Advertisement

राज्यातील लॉकडाउन लगेच काढणं शक्य नाही, यावर मुख्यमंत्र्यांसोबत सर्वच मंत्र्यांचं एकमत झाले. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यातील ‘पॉझिटिव्ही रेट’ जास्त असल्याने सरकार अजूनही सावध भूमिकेत आहे. राज्याच्या ‘टास्क फोर्स’शी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली

Advertisement

दरम्यान, तौकते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीपोटी वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच गेल्या काही वर्षांपासून चंद्रपुरात दारूबंदी करण्यात आली आहे. मात्र, त्याचा उलटा परिणाम झाला आहे. अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

लस आयातीसाठी मागविलेल्या ग्लोबल टेंडरला विविध कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. काही कंपन्यांनी किंमतही सांगितली आहे. मात्र, लस आयातीबाबत राष्ट्रीय पातळीवर एकच धोरण निश्चित करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement

Leave a Reply