Take a fresh look at your lifestyle.

यास चक्रीवादळाचा कहर, 15 लाख लोक बेघर.! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

0

‘यास’ चक्रीवादळामुळे (Yaas cyclone) पश्चिम बंगाल, ओरिसामध्ये हाहाकार उडाला. दोन्ही राज्यांतील सुमारे तीन लाख घरांचे नुकसान झाले आहे. तसेच, तब्बल १५ लाख लोक बेघर झाले आहेत. पश्चिम बंगालमधीलच (Pachim Bengal) एक कोटी लोकांना या वादळाचा फटका बसल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

‘तौकते’ चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टी भागाला मोठा तडाखा दिला होता. त्यानंतर आता देशाच्या पूर्व किनारपट्टी भागातील ओरिसा व पश्चिम बंगाल येथे यास चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळत आहे. ओरिसातील धामरा बंदर ते बालासोर प्रदेशाला बुधवारी (ता.26) सकाळी ‘यास’ चक्रीवादळ धडकले.

Advertisement

ताशी 135 ते 145 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तर ओरिसातील किनारपट्टीवरील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. असंख्य झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. वीज गायब झाल्याने हजारो गावे अंधारात बुडाली होती. या वादळात दक्षिण २४ परगणा, पूर्व मेदिनीपूर, उत्तर २४ परगणा जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले.

मुख्यमंंत्री ममता बॅनर्जी उद्या (शुक्रवारी) या भागाची हवाई पाहणी करणार आहेत. ओरिसातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील नदीत बोट उलटली होती; पण सुरक्षा पथकाने बोटीतील सर्व 10 प्रवाशांना वाचविले. राज्यातील बालासोर जिल्ह्यातील काही गावांत समुद्राचे पाणी शिरले होते.

Advertisement

ओरिसा व पश्चिम बंगालसह पाच राज्ये व अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशात ‘नॅशनल डिझाॅस्टर रिस्पॉन्स फोर्स’ (एनडीआरएफ)च्या 113 तुकड्या तैनात केल्या होत्या. त्यांनी केलेल्या बचावकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

झारखंडमध्ये आज (ता.27) यास चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने, तेथे अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. लाखो नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

Advertisement

महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, ‘यास’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे़, अमरावती, सिंधुदूर्ग, नांदेड, लातूर, अकोला, यांसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement

Leave a Reply