SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ बुधवार, 26 मे 2021

मेष (Aries) : विरोधकांच्या कारवाया वाढू शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल.

Advertisement

वृषभ (Taurus) : मानापमानात अडकून पडू नका. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील. कष्टाला मागे पुढे पाहू नका. मित्र मंडळींशी सलोखा ठेवावा लागेल.

मिथुन (Gemini) : जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. मानसिक स्वास्थ्य जपावे. स्त्री वर्गापासून दूर राहावे.

Advertisement

कर्क (Cancer) : क्षुल्लक कारणांनी खिळून पडल्यासारखे वाटेल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह (Leo) : आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. घरातील कामात अडकून पडल्यासारखे वाटेल. शब्द जपून वापरावे लागतील.

Advertisement

कन्या (Virgo) : चौकसपणा दाखवाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कामात वारंवार बदल करू नका. आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न कराल.

तूळ (Libra) : मैत्रीचे संबंध जपावेत. सुखासक्तपणा जाणवेल. कामात काहीशी चालढकल कराल. पैज जिंकता येईल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : नैराश्याला दूर सारावे. प्रवासात सतर्कता बाळगावी. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. तुमच्या संपर्कातील लोकात भर पडेल.

धनु (Sagittarius) : निराश होऊ नका. बौद्धिक चलाखी दाखवावी. वागण्या-बोलण्यात सज्जनपणा ठेवाल. भावनाशीलता वाढू शकते.

Advertisement

मकर (Capricorn) आवेगाला आवर घालावी लागेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. व्यावसायिक कमाईकडे लक्ष द्यावे.

कुंभ (Aquarius) : जवळच्या प्रवासात सावधानता बाळगावी. मनातील नसती भीती दूर सारावी. मानसिक चांचल्य जाणवेल. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल.

Advertisement

मीन (Pisces) : मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन घडवाल. कौटुंबिक कामात दिवस जाईल. मानसिक ताण जाणवेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement