SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला माहिती आहे का? कोरोनाबाधित मृतदेहात कोरोना विषाणू किती वेळ राहतो ॲक्टिव्ह?

कोरोनाबाधित रुग्ण म्हटलं की, आपण त्या व्यक्तीच्या जवळ न जाता जेवढं लांब जाता येईल तेवढे लांब जातो. तर कोरोनाबाधित मृतदेहाच्या अस्थींनाही काही जण हात लावण्यास धजावत नाहीत.

पण कोरोनाबाधित व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या शरिरातील कोरोनाचे विषाणू ॲक्टिव्ह असतात का? असले तर ते किती काळ ॲक्टिव्ह राहू शकतात? याविषयी एम्समधील डॉक्टर कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर कोरोना व्हायरस किती दिवस राहतो, याचा अभ्यास करणार आहेत.

Advertisement

दिल्ली रुग्णालयातील फॉरेन्सिक प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार..

या अभ्यासामुळे हा व्हायरस माणसाच्या अवयवांवर कसा परिणाम करतो? हे देखील शोधण्यास मदत होऊ शकते. या अभ्यासासाठी मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांकडून त्यांची संमती मिळविली जाईल. या अभ्यासात रोग विज्ञान आणि अणुजीव विज्ञान यांसारखे आणखी इतर अनेक विभाग सामिल होणार आहेत.

Advertisement

त्यांनी सांगितले की, कोरोना बाधित मृतदेहात म्हणजेच नाकात आणि तोंडात कोरोनाचे विषाणू 12 ते 24 तासांनंतर ॲक्टिव्ह राहू शकत नाहीत. याबाबतचा प्राथमिक अभ्यास गेल्या वर्षभरापासून एम्सच्या फॉरेन्सिक मेडिकल विभागात सुरु होता.

जवळपास 100 मृतदेहांची मृत्यूनंतर 12 ते 24 तासांमध्ये अनेक वेळा कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला. कोरोना विषाणू मृत्यूच्या 24 तासांनंतर नाक आणि तोंडात ॲक्टिव्ह राहू शकत नाही. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर 12 ते 24 तासांनी त्याच्यापासून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जवळपास नसते.

Advertisement

गुप्ता यांनी सांगितले की, ‘कोरोना बाधित मृतदेहाची राख आणि अस्थी गोळा करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यापासून कोणताही संसर्ग होत नाही.’ ते पुढे म्हणाले की, हा अभ्यास कोरोना बाधित मृतदेहाची हेळसांड होऊ नये यासाठी करण्यात आला होता.

मृतदेह हाताळणी काळजी घेऊनच…

Advertisement

आयसीएमआरने कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाचे शवविच्छेदन करतानाची मार्गदर्शक तत्वे मे 2020 मध्येच प्रसिद्ध केली होती. ‘आयसीएमआर’ने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या फॉरेन्सिक पोस्टमार्टमसाठी चिर-फाड तंत्राचा वापर करु नये, कारण असं करणं धोकादायक ठरू शकतं. म्हणून, कोरोनाबाधित मृतदेहावर, कोणत्याही चिर-फाडविना शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला जातो. खबरदारी म्हणूनच अशा प्रकारचे मृतदेह हाताळताना लोकांनी मास्क, ग्लोव्ह आणि पीपीई किट घालणे गरजेचे असते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement