SpreadIt News | Digital Newspaper

फेसबुक, इंस्टाग्राम , ट्विटर नव्या नियमांमुळे बंद होऊ शकतं का? फेसबुकने दिली प्रतिक्रिया..

0

फेसबुक , ट्विटर आणि इंन्स्टाग्राम (Facebook, Twitter, Instagram) या समाजमाध्यमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने देशातील या सोशल मीडिया (Social Media) कंपन्यांना फेब्रुवारी महिन्यातच केंद्र शासनानं या समाज माध्यमांच्या कंपन्यांना त्यांच्या धोरणांमध्ये बदल करत नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी दिलेली मुदत आज (26 मे) संपत आहे.

फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या नियमानुसार, सरकारतर्फे आक्षेप किंवा तक्रार आल्यावर 36 तासांत तो कंटेंट (Content) प्लॅटफॉर्मवरुन हटवावा लागेल अशा प्रकारची काही बंधणं घालण्यात आली आहेत. Koo (कू) नावाचा भारतीय प्लॅटफॉर्म जो ट्विटरप्रमाणे काम करतो त्यांनी मात्र हे नियमांची पूर्तता केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर अशा कंपन्यांनी मात्र यावर अद्याप काही बदल केलेला नाही.

Advertisement

सरकारने दिलेली डेडलाईन संपत आल्यानंतर फेसबुकने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकने याबाबत म्हटले आहे की, कंटेंट रेग्युलेट करण्यासाठी सरकारच्या नवीन नियमांचे पालन करण्याची त्यांची इच्छा आहे.

नवे नियम काय सांगतात?

Advertisement

नव्या नियमानुसार सर्व समाजमाध्यम कंपन्यांना भारतात नियमांचं पालन केलं जात आहे ना यासाठी भारतीय नागरिक असलेल्या अनुपालन अधिकाऱ्याची नेमणूक करणे बंधनकारक आहे

संबंधित अधिकारी समाजमाध्यमांवर येणारा मजकूर आक्षेपार्ह आहे का, त्यासंदर्भात काही तक्रारी आहेत का, याची शहानिशा करेल. मजकूर आक्षेपार्ह असल्याचे आढळल्यास तो तात्काळ हटविण्याचे अधिकार त्यास असतील.

Advertisement

तक्रार निवारण करण्यासाठी एक अधिकारी नियुक्त करा. या सर्वांना दर महिन्याला तक्रारींवर काय कार्यवाही केली त्याची माहिती द्याची लागेल.

हे नियम केवळ समाजमाध्यम कंपन्यांनाच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्म्सनाही (OTT Platform) लागू आहेत

Advertisement

समाजमाध्यमी कंपन्यांचे स्वनियम कायदे (Laws) नसल्याने विविध मंत्रालयांतील प्रतिनिधींची एक समिती स्थापन करून त्यावर लगाम ठेवला जाईल.

फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले की..

Advertisement

आमचे ध्येय आयटी (IT) नियमांच्या तरतुदींचे पालन करणे आणि काही मुद्द्यांवर सरकारसोबतची चर्चा जारी ठेवणे हे आहे. कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की, आयटीच्या नियमांनुसार आम्ही ऑपरेशनल प्रक्रियेची अंमलबजावणी आणि कार्यक्षमता सुधारण्याचे काम करीत आहोत. आमच्या प्लॅटफॉर्मवर यूजर्सना सुरक्षित आणि मुक्तपणे व्यक्त होता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. फेसबुकने असं सांगितलं आहे की, आम्ही सरकारच्या नियमांचं पालन करणार आहोतच मात्र याबाबत असलेल्या काही शंकांसाठी सरकारसोबत बोलणी सुरू आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement