SpreadIt News | Digital Newspaper

लॉकडाऊन संपणार की शिथिल होणार? ‘असा’ असू शकतो सरकारचा अनलॉक प्लॅन…

0

राज्यातील सरकार लॉकडाऊन (Lockdown) शिथिल करण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. या अनुषंगाने चार टप्प्यात राज्य अनलॉक (Unlock) करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे 1 जूनपासून राज्य सरकार काही गोष्टींवरील निर्बंध मागे घेण्याच्या तयारीत आहे.

एप्रिल- मे महिन्यात राज्यात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठला होता. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने एप्रिल महिन्यात लॉकडाऊन घोषित केला होता. त्यानंतर टप्याटप्यानं या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली होती. मे महिन्याच्या 15 तारखेपासून कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात अटोक्यात येत आहे. त्यामुळं 1 जूनपासून राज्यातील कठोर निर्बंध शिथील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी (Health Minister) महत्त्वपूर्ण संकेत दिले. ‘1 जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील, निर्बंध एकहाती मागे घेण्यात येणार नसून टप्याटप्यानं मागे घेतले जातील, असं सूचक विधान राजेश टोपे यांनी केलं होतं.

अनलॉक प्रक्रिया 4 टप्प्यात?

Advertisement

राज्य सरकार 4 टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. आता राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकानं केवळ सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. (जिल्ह्यानुसार काही ठिकाणी दुकाने बंद आहेत) याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता आटोक्यात आला आहे. मुंबईसह नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील चिंताजनक नाही.

प्राप्त माहीतीनुसार, सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देण्याची शक्यता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने (Shops) उघडली जातील. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार (Hotel, Restaurants, Bar) सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा (Local Trains) आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील, असा अंदाज आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

Advertisement

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी कोकण दौरा केला. त्यावेळी मुख्यमंत्री (CM Udhhav Thackeray- Chief Minister of Maharashtra) म्हणाले,” त्यावर, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, कोरोना कमी होतोय हे नक्कीच. पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्यावेळी आपण अनुभव घेतलाय. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण, थोडीशी शिथिलता आली अन् रुग्णसंख्या वाढली. आता सध्याच्या काळात जिल्हाबंदी कधी उठवायची, याबाबत परिस्थिती पाहून आढावा बैठकीत निर्णय घेतला जाईल. ज्या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहेत तिथं रुग्णसंख्या पाहून निर्णय घेण्यात येणार आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement