SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम बंद होणार? सरकारच्या नव्या नियमांकडे सोशल मीडिया कंपन्यांचे दुर्लक्ष..!

सोशल मीडियातून अनेकदा अफवा, चुकीची माहिती पसरवली जाते. एखाद्या विशिष्ट समाजाच्या भावना भडकावणाऱ्या पोस्ट (Post) व्हायरल करण्याचे काम काही समाजकंटक करीत असतात. असे प्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) यांसारख्या सोशल मीडिया कंपन्यांना काही सूचना केल्या होत्या.

सोशल मीडियाद्वारे प्रसारीत होणाऱ्या कंटेंटवर लक्ष ठेवण्यासाठी ‘खास अधिकारी’ नेमण्याच्या सूचना केंद्र सरकारने 25 फेब्रुवारी रोजी या कंपन्यांना केल्या होत्या. त्यासाठी या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत उद्या (ता. 26) संपत असताना, या कंपन्यांनी अजूनही या नियमांची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे कदाचित येत्या दोन दिवसांत या कंपन्यांची सेवा बंद होण्याची शक्यता आहे.

Advertisement

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (Union Ministry of Electronics and IT) सोशल मीडिया कंपन्यांना ‘कम्प्लायनस् अधिकारी’ (Compliance Officer), ‘नोडल अधिकारी’ (Nodal Officer) नेमण्यास सांगितले होते. या सर्व कंपन्या परदेशी असल्याने, त्यांची मुख्यालये परदेशातच आहेत. त्यामुळे ‘कम्प्लायन्स अधिकारी’ भारतीय व भारतात राहणारा असला पाहिजे, असं सरकारने म्हटलं होतं.

सरकारच्या नव्या नियमानुसार, युजर्सच्या अडचणी सोडवणं, चुकीचा कंटेंट (Content) हटविण्याची जबाबदारी या कंपन्यांचीच आहे. नव्या नियमानुसार एका समितीचीही स्थापना केली जाणार असून, आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींवर ही समिती सुनावणी घेणार आहे.

Advertisement

तसेच वाईट कंटेन्ट ब्लाॅक (Block) करण्यासाठी ‘ऑथोराइज्ड ऑफिसर’ (Authorized Officer) नेमावा लागेल. जी कंपनी नियमांचं पालन करणार नाही, त्यांचं ‘इंटरमीडियरी स्टेटस’ (Intermediary status) रद्द केलं जाऊ शकतं. तसंच त्यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सरकारने दिलेली मुदत 26 मे रोजी संपत असतानाही या कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. काही कंपन्यांनी त्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदत मागितली असल्याचं सांगण्यात आलं.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement