SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता Google सांगणार तुम्ही सर्च केलेली माहीती खरी की खोटी?

जगभरात इंटरनेटचं जाळं खूप मोठं आहे. या काळात व्हॉट्सॲप (Whatsapp), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) यांसारखे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स कोणत्याही प्रकारची माहिती पसरवण्यासाठी कारणीभूत असतात. याद्वारे अनेक न्यूज व्हायरल होत असतात.

काही संवेदनशील माहीती, बातमी त्यापैकी काही न्यूज फेक (Fake News) न्यूजही असतात. परंतु आता ट्विटर, फेसबुक आणि गुगलसारखे मोठे प्लॅटफॉर्म फेक न्यूजवर लक्ष ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहेत.

Advertisement

Google चं नवं फीचर कसं काम करणार?

ट्विटरने फेक न्यूजला Manipulated Media चा टॅग देणं सुरू केलं आहे, आता Google हे एक नवं फीचर लाँच करणार आहे, जे युजर्सला फेक न्यूजबाबत माहिती देईल. गुगलने काही दिवसांपूर्वी झालेल्या आपल्या वार्षिक सभेत About this Result फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर गुगल सर्च (Google Search) केल्या गेलेल्या गोष्टीच्या sources (स्रोत) बाबत माहिती देईल.

Advertisement

याशिवाय ज्या वेबसाईटची ती लिंक आहे, ती किती विश्वासार्ह आहे, याबाबतही युजरला गुगलचं हे फिचर माहिती देणार आहे, यासाठी गुगल इनसायक्लोपीडिया (Encyclopedia), Wikipedia सोबत काम करत आहे.

‘असं’ करेल काम –

Advertisement

या फीचरने युजर ज्यावेळी गुगलवर काही माहिती सर्च करेल, त्यावेळी नेहमीप्रमाणे कित्येक वेबसाईट्सच्या लिंक ओपन होतील. त्यानंतर युजरला लिंकच्या बाजूला असलेल्या तीन डॉट मेन्यूवर क्लिक करावं लागेल. ती वेबसाईट सुरक्षित आहे की नाही याबाबत Google माहिती देईल.

तसेच सदर वेबसाईटची माहिती विकीपीडियावर उपलब्ध आहे की नाही, जी लिंक तुम्ही वाचत आहात, ती Paid आहे की Unpaid आहे, गुगल तुम्ही सर्च केलेली माहिती नेमकी कुठून येत आहे याबाबत सांगेल, त्यामुळे युजरला त्या साईटवर किती विश्वास ठेवावा हे समजण्यास मदत होईल, अशा काही गोष्टींची माहिती गुगलकडून दिली जाईल.

Advertisement

हे फीचर अमेरिकेत यावर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आलं होतं. आता यावर्षाच्या अखेरीस हे फीचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे फीचर केवळ इंग्रजी भाषेच्या रिझल्टसाठी काम करत असल्याची माहीती आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement