SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ बँकांच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी! काहींचे चेक पेमेंट सुरक्षित होणार, तर काहींचे IFSC कोड बदलणार, जाणून घ्या..

जर तुम्ही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), कॅनरा बँक (Canara Bank) आणि सिंडिकेट बँकेचे (Syndicate Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी चेक पेमेंट संबंधित नियमात बदल होणार आहे. तर कॅनरा आणि सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांसाठी आयएफएससी कोड संबंधित बदल होणार आहेत.

1 जून पासून चेक पेमेंटविषयी नियम बदलणार

Advertisement

Bank of Baroda 1 जूनपासून ‘Positive pay confirmation’ अनिवार्य करणार आहेत. म्हणजेच, याअंतर्गत जर धनादेश (Cheque) ने 2 लाखांहून अधिक पेमेंट केलं गेलं तर ग्राहकाला पुन्हा याची खात्री करावी लागेल. त्याच्या परवानगीशिवाय हा व्यवहार (Transaction) बँक करत नाही. हा नियम 1 जून पासून लागू होणार आहे.

पॉझिटिव्ह पे सिस्टिम एक प्रकारे फसवणूकीला आळा घालणारे एक टूल आहे. ‘पॉझिटिव्ह पे’ (Positive Pay System) या सिस्टिम अंतर्गत ग्राहकांने चेक जारी केल्यानंतर या सिस्टिम अंतर्गत एखाद्याने चेक टाकल्यानंतर त्याला आपल्या बँकेची संपूर्ण डिटेल्स द्यावे लागणार आहेत.

Advertisement

या प्रकारच्या पुष्टीकरणासाठी (कन्फर्मेशन) ग्राहकाला धनादेशाशी संबंधित धनादेश (चेक), देय रक्कम, खाते क्रमांक (Bank Account Number), धनादेश क्रमांक, व्यवहार कोड आणि धनादेश देण्याच्या तारखेची भरपाई करणार्‍याचे नाव ही माहिती द्यावी लागेल.

चेक पेमेंट (Cheque Payment) करण्याआधी बँक ही माहिती क्रॉस चेक करेल. जर यामध्ये कोणताही गोंधळ आढळून आल्यास बँक तो चेक रिजेक्ट करेल.

Advertisement

1 जुलैपासून बदलणार ‘या’ बँकेचे IFSC कोड

कॅनरा बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 1 जुलैपासून आयएफएससी कोड (IFSC Code) बदलणार आहे. सिंडिकेट बँकेचे ग्राहक अजूनही त्यांचा जुनाच आयएफएससी कोड वापरत आहे. परंतु 1 जुलैपासून हा कोड वापरल्यास व्यवहार होणार नाही आणि त्यांना व्यवहार करण्यासाठी नव्या कोडची गरज असेल. सिंडिकेट बँकेने ग्राहकांना नवीन आयएफएससी कोड 30 जूनपर्यंत अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. नवीन आयएफएससी कोड माहीत करून घेण्यासाठी कॅनरा बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन माहीत करून घ्या.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement