SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतातील टॉप 5 स्मार्ट टीव्ही, जे आहेत स्वस्त आणि मस्तही! जाणून घ्या त्यांच्यातील काही खास गोष्टी..

भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात अनेक मोठ्या ब्रँड टीव्हीचा समावेश आहे. काहींमध्ये तर काहींमध्ये OTT प्लॅटफॉर्म वापरता येतील. या सर्व टीव्हीला ॲमेझॉन प्राइम (Amazon Prime), यूट्यूब (YouTube) आणि डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar) सारख्या ओटीटी अ‍ॅप्सचा सपोर्ट दिला आहे.

जाणून घेऊयात, स्वस्त आणि बेस्ट स्मार्ट टीव्हीबद्दल..

Advertisement

▪️ KODAK 7XPRO स्मार्ट टीवी – KODAK 7XPRO हा स्वस्त स्मार्ट टीव्ही आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंचाचा डिस्प्ले आहे. या आकर्षक स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला यूट्यूब व डिस्ने प्लस हॉटस्टार सपोर्ट मिळेल. त्यासोबतच या टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट (Google Assistant) आणि इन-बिल्ट क्रोमकास्ट (Chromcast) देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा टीव्ही दोन बॉक्स स्पीकर्ससह सुसज्ज आहे. याची किंमत 13,999 रुपये आहे.

▪️ infinix x1 स्मार्ट टीव्ही – infinix X1 स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे., ज्याची फ्रेम एक बेझलसह सुसज्ज असून या स्मार्ट टीव्हीमध्ये ( Smart TV) चांगल्या कामगिरीसाठी MTK 6683 64 Bit क्वाड कोर प्रोसेसर (64 Bit Quad Core Processor) दिला आहे. तसेच, दोन स्पीकर्स आणि एक सब-वूफर दिले आहेत. हा टीव्ही डॉल्बी साऊंड (Dolby) तंत्रज्ञानास सपोर्ट देतो. तसेच, याला Google असिस्टंट आणि इन-बिल्ट क्रोमकास्टचा सपोर्ट मिळेल. या टीव्हीची किंमत 13,999 रुपये आहे.

Advertisement

▪️ TOSHIBA L50 Series स्मार्ट टीव्ही – हा स्मार्ट टीव्ही एडीएस पॅनेलसह येतो. त्यामुळे पिक्चर क्वालिटी सुधारते. तोशिबा स्मार्ट टीव्हीमध्ये शक्तिशाली ऑपरेटिंग सिस्टम (OS), कॉर्टेक्स-ए 53 64 बीट प्रोसेसर आणि दोन स्पीकर्स सपोर्ट देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना 32-इंचाचा टीव्ही, ऑटो-पॉवर ऑफ आणि स्लीप टाइमर सुविधा असलेल घड्याळ मिळेल. तोशिबाच्या या टीव्हीची किंमत 15,999 रुपये आहे.

▪️ Mi 4A PRO स्मार्ट टीव्ही – शाओमीच्या (Xiaomi) उत्कृष्ट टीव्हीपैकी एक हा Mi 4A PRO आहे. या स्मार्ट टीव्हीला 32 इंच डिस्प्लेसह मनोरंजनाचा अधिक चांगला अनुभव घेण्यासाठी नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सपोर्ट दिला आहे. या टीव्हीला गूगल असिस्टंट, Amlogic 64-bit क्वाड कोर प्रोसेसर आणि दोन स्पीकर्स यांचा सपोर्ट दिला आहे. याची किंमत 14,999 रुपये आहे.

Advertisement

▪️ Realme स्मार्ट टीव्ही – Realme च्या स्मार्ट टीव्हीचे डिझाईन बेझलसह येते. या स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंचाचा डिस्प्ले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 3 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्टसुद्धा आहेत. याशिवाय Realme टीव्हीला MediaTek क्वाड कोर प्रोसेसर व उत्कृष्ट आवाजासाठी 4 स्पीकर्स मिळतात. याची किंमत 14,999 रुपये आहे.

(महत्वाचे: या सर्व स्मार्ट टीव्हीच्या किंमती या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर ऑफर्सनुसार कमी-अधिक होऊ शकतात. आम्ही तुम्हाला योग्य माहीती पुरवण्याचा प्रयत्न केला आहे.)

Advertisement