SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोनामुक्त करणाऱ्या आयुर्वेदिक औषधासाठी झुंबड, आंध्र प्रदेशमधील वैद्याचा दावा

कोरोनावर अजून तरी रामबाण उपाय सापडल्याचे दिसत नाही. असे असताना, आंध्र प्रदेशमधील (Andra Pradesh) एका वैद्याने एक आयुर्वेदिक औषध बनविले आहे. कोरोनावर (corona) हे औषध 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा या वैद्याने केला आहे. हे मोफत औषध घेण्यासाठी सध्या झुंबड उडाली आहे.

आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम येथील बी. आनंदय्या नावाच्या वैद्याने हे आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. ‘कृष्णपट्टणम कोरोना औषध’ असं या औषधाचं नाव आहे. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांनाही या घटनेची दखल घ्यावी लागली.

Advertisement

कोरोनावर हे औषध खरंच प्रभावी आहे का, हे जाणून घेण्यासाठी ‘आयसीएमआर’च्या तज्ज्ञ त्यावर संशोधन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री ए. के. के. श्रीनिवास यांनी दिली. भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही केंद्रीय आयुष मंत्री आणि ‘आयसीएमआर’ला (ICMR) या औषधावर संशोधन करायला सांगितलं आहे.

प्रकृती गंभीर असल्यास, कोरोना रुग्णास ‘आयड्राॅप’ (eyedrop)दिला जातो. या औषधाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यानंतर काही मिनिटांत ‘ऑक्सिजन पातळी’ वाढते, असा दावा केला जात आहे. आतापर्यंत या औषधाचे ‘साईड इफेक्ट’ दिसले नसल्याचे स्थानिक आमदार के. गोवर्धन रेड्डी यांनी सांगितलं.

Advertisement

नेल्लोरचे जिल्हाधिकारी के. व्ही. एन. चक्रधर बाबू यांनी औषधाच्या चाचणीसाठी एक समिती नेमली आहे. हैदराबादमधील आयुष प्रयोगशाळेत औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठविल्याचे सांगण्यात आले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement