देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) खातं असेल, तर अलीकडेच बँकेने काही सेवा बंद ठेवण्यात येणार असण्यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
एसबीआय’ने ट्विट करत दिली माहिती
मेंटेनन्ससाठी (Maintenance) बँकिंग सेवा 21 मे पासून 23 मे पर्यंत काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. एसबीआयने अशी माहिती दिली आहे की, ग्राहकांना समस्येविना बँकिंगचा अनुभव मिळावा याकरता मेंटेनन्सचे काम केले जात आहे.
बँकेने यामध्ये असे सांगितले आहे की, 21 मे रोजी रात्री 10.45 पासून ते 22 मे रात्री 1 वाजून 15 मिनिटांपर्यंत, त्याचप्रमाणे 23 मे रोजी रात्री 02.40 वाजता ते पहाटे 06.10 वाजेपर्यंत मेंटेनन्सचं काम असणार आहे. त्यामुळे या वेळेत ग्राहकांना सुविधा मिळू शकणार नाही.
बँकेने अशी माहिती दिली आहे की, इंटरनेट बँकिंग (INB), योनो, योना लाईट आणि यूपीआयवर बँकिंग सुविधा उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे यादरम्यान एसबीआय ग्राहक INB/YONO/YONO Lite/UPI या सेवांचा वापर करू शकणार नाहीत. स्टेट बँक ऑफ इंडियाने Important Notice अंतर्गत ही सूचना जारी केली आहे.
बँकेकडून अशाप्रकारे मेंटेनन्सची प्रक्रिया ही सुविधेत अधिक गुणवत्ता यावी यासाठी वारंवार केली जाते, जेणेकरून बँक UPI प्लॅटफॉर्म, ऑनलाइन प्लॅटफॉर्म अपडेट करू शकेल. त्यामुळे ग्राहकांना नेहमीच चांगल्या बँकिंगचा अनुभव घेता येईल.
एसबीआय बँकेच्या शाखांमधील काम मर्यादित वेळेत
आता तुम्हाला एसबीआय बँक शाखेत काम असेल, ते बँकेने त्यांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करून सकाळी 10 ते दुपारी 2 ही वेळ केली आहे. बँक शाखेत जाणाऱ्या ग्राहकांना मास्क लावणं बंधनकारक आहे, अन्यथा त्यांनी बँकेत प्रवेश दिला जाणार नाही. म्हणून या वेळेनुसार बँका आता केवळ 4 तासांसाठीच खुल्या ठेवण्यात येणार आहे.
कोव्हिड-19 मुळे एसबीआयच्या शाखेत होतील फक्त ‘ही’ कामे-
▪️ पैसे डिपॉझिट करणे किंवा पैसे काढणे
▪️ चेक संबंधी कामं
▪️ डिमांड ड्राफ्ट (डीडी)
▪️ आरटीजीएस
▪️ एनईएफटीशी
▪️ शासकीय चलान संबंधित कामं
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u