SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध अखेर थांबलं, 11 दिवसांनंतर शांततेची घोषणा

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील गेल्या 11 दिवसांच्या हिंसक संघर्षानंतर अखेर युद्धबंदी झाली. इस्रायलच्या मंत्रिमंडळाने आज (शुक्रवारी) पहाटे युद्धबंदीची घोषणा केली. मागील 11 दिवसांत गाझापट्टीत 240 हून अधिक जणांचा मृत्यू झाला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सुरक्षा कॅबिनेटने गाझा पट्टीतील सैन्य अभियान रोखण्यास एकतर्फी मंजुरी दिली. इस्रायलच्या या निर्णयानंतर हा आपला विजय असल्याचे सांगत ‘हमास’मध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. त्यामुळे हमास-इस्रायल यांच्यातील हा संघर्ष किती काळ टिकणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात पूर्व जेरुसलेम शहरावरुन वाद आहे. त्यातून 7 मे रोजी पूर्व जेरुसलेममधील ‘अल-अक्सा’ मशिदीजवळ ज्यू आणि अरब यांच्यात चकमक झाली. त्यानंतर 10 मेपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. ‘हमास’ या पॅलेस्टाईनमधील कट्टर संघटनेने केलेल्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलनेही तसेच उत्तर दिले.

तब्बल 11 दिवसांच्या रक्तरंजीत युद्धात गाझापट्टीत आतापर्यंत कमीत कमी 232 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 100 महिलांसह काही मुलांचाही समावेश आहे. गाझापट्टीत ठार झालेल्या लोकांमध्ये ‘हमास’चे कमीत कमी 150 अतिरेकी असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.

Advertisement

गाझा पट्टीतून ‘हमास’ने इस्रायलवर 4000 रॉकेट्स डागली. मात्र, त्यातील 500 हून अधिक रॉकेट्स गाझा पट्टीतच कोसळले, तर इस्रायलमध्ये आलेली 90% रॉकेट्स क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने पाडल्याचं इस्रायलने सांगितलं.

अखेर 11 दिवसानंतर इस्रायलने संघर्ष थांबविल्याचे जाहीर केले. इस्रायलने निवेदनात म्हटले आहे, की सुरक्षा संबंधित कॅबिनेटच्या बैठकीत इजिप्तच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यात ‘हमास’विरुद्धच्या युद्धाला विराम देण्याची ‘ऑफर’ देण्यात आली. संघर्ष विरामासाठी कोणतीही अट ठेवली नव्हती. त्यावर दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली असून, आम्ही संघर्ष विराम जाहीर करत आहोत.’

Advertisement

इस्रायलने संघर्षविराम जाहीर करताच गाझा शहरात जल्लोष करण्यात आला. हजारो लोकांनी रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी केली. ‘हमास’चा झेंडा फडकावून आनंदाला वाट मोकळी करून दिली. ‘आम्ही इस्रायलवर विजय मिळविला..’ असं ‘हमास’च्या एका नेत्याने सांगितलं.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement