SpreadIt News | Digital Newspaper

गुगलवर ‘भलतं-सलतं’ सर्च करताय? नो टेंशन! तुमची हिस्ट्री स्वतः गुगल डिलीट करणार…

प्रायव्हसीचं रक्षण करण्यासाठी गुगलने (Google) आपल्या युजर्ससाठी (Internet Users) सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल उचललं आहे. युजर्सला आपल्या डेटावर अधिक नियंत्रण ठेवण्याची सुविधा देणारी गुगल दुसरी टेक कंपनी ठरली आहे. जानेवारी 2020 मध्ये फेसबुकने घोषणा केली होती की, युजर्सकडे आता एका क्लिकवर काम करणारं ‘क्लियर हिस्ट्री’ बटण असेल.

15 मिनिटांत हिस्ट्री डिलीट होणार

Advertisement

Google ने वार्षिक आयओ परिषदेत घोषणा केली की, डेव्हल्पर्ससाठी ‘Quick Delete’ सर्च हिस्ट्री फीचर लवकरच आणत आहोत. या फिचरमुळे मागच्या 15 मिनिटांत केलेल्या कोणत्याही सर्च हिस्ट्रीला हटवण्याची सुविधा मिळणार आहे.

गुगल आणि फेसबुकसारख्या आघाडीवर असणाऱ्या टेक कंपन्यांना आपल्या युजरच्या प्रायव्हसीसंबंधित अनेक चाचण्या कराव्या लागत आहेत. तसंच युजर्सचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललं जात आहे.

Advertisement

ब्लूमबर्गने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, व्हर्चुअल इव्हेंटमध्ये गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेन फिट्जपॅट्रिक यांनी ‘आम्ही युजर्सची कोणतीही वैयक्तिक माहिती विकत नसल्याचं’ सांगितलं. तसंच गुगल इव्हेंटमध्ये इतर प्रायव्हसी आणि वैशिष्ट्यांविषयी माहितीही देण्यात आली. यात पासवर्ड सुरक्षा (Password Security) आणि अँड्रॉईड (Android) डिव्हाईससाठी डेटा उपयोग परवानगीबाबत इतर टूलही सामिल आहेत.

गुगल सर्च हिस्ट्री क्विक डिलीट करण्यासाठी..

Advertisement

गुगल अकाउंटच्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा. मग तुम्हाला एक ड्रॉप-डाउन मेन्यू दिसेल.

तेथे ‘डिलीट लास्ट 15 मिनिट्स’ वर क्लिक करा आणि युजरची सर्वात शेवटची सर्च हिस्ट्री डिलीट होईल.

Advertisement

ऑटो डिलीट कंट्रोलसह युजर वेळेची निवड करू शकतो. त्या कालावधीतील कोणताही सर्च डेटा डिलीट होईल.

ऑटो डिलीट कंट्रोल लोकेशन हिस्ट्री आणि वेब, अ‍ॅप संबंधी डेटाही युजरला डिलीट करण्यासाठी लागू आहे.

Advertisement

2019 मध्ये गुगलने एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की, युजर्स आपल्या गुगल अकाउंटमध्ये लोकेशन हिस्ट्री आणि वेब आणि इतर अ‍ॅप संबंधी बाबी सहजपणे ऑन-ऑफ करण्यासाठीची सुविधा मिळाली आहे आणि युजर्सला हवं असल्यास ते सर्व डेटा मॅन्युअली डिलीट करू शकतात. त्याशिवाय आम्ही ऑटो-डिलीटची घोषणा करत आहोत, जो तुमचा डेटा मॅनेज करणं अधिकच सोपं करेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement