SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता तुम्हीच करा घरच्या घरी तुमची स्वतःची कोरोना चाचणी; ‘ही’ टेस्ट किट करणार तुम्हाला मदत..

नागरिकांना कोरोना चाचणी करण्यासाठी आता खासगी किंवा सरकारी रुग्णालय जाण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकारच्या इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) बुधवारी नागरिकांना घरीच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी काही गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

तसेच, गेल्या काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्यात आलं होतं. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरने नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि बर्‍याचदा हे अयोग्यपद्धतीने वापरले गेलेय, असं तज्ज्ञांचं मत आहे.

Advertisement

घरच्या घरी कशी करायची रॅपिड अँटिजेन टेस्ट?

आयसीएमआरने कोरोना टेस्टबाबत नवीन मार्गदर्शक सूचना (Guidlines) जारी केल्या आहेत. तुम्हाला माहीतच असेल की, आरटी-पीसीआर टेस्ट ही लॅबमध्ये केली जाते, तर रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) विविध ठिकाणी जाऊन केली जाते. त्यानुसार लोक घरीसुद्धा अँटिजेन टेस्ट करू शकतात. ही टेस्टिंग फक्त लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांसाठी आहे, जे लॅब टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या संपर्कात आले आहेत.

Advertisement

पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेडने (My Lab Discovery solution Ltd.) ही टेस्ट किट तयार केली आहे. ‘COVISELF’ असं या किटचं नाव आहे. या किटमार्फत लोक आपल्या नाकातील स्वॅब सॅम्पल घेऊन आपली चाचणी करू शकतील. RAT चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांना कोरोनाबाधित समजले जाणार आहे. त्यांना पुन्हा चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.

टेस्ट करण्यासाठी प्रथम आपल्याला माय लॅबचं मोबाईल ॲप डाऊनलोड करावं लागेल, त्यानंतर त्यावर फोटो अपलोड करावा लागेल. फोटो अपलोड केल्यानंतर रिपोर्ट येणार आहे. त्यात तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह हे समजणार आहे. परंतु रॅटमध्ये जे लोक निगेटिव्ह आढळत आहे, त्या व्यक्तींची RT-PCR चाचणी होणे आवश्यक आहे.

Advertisement

‘निरी’ ने शोधली कोरोना चाचणी करण्याची नवी पद्धत

आता कोरोना चाचणीसाठी (corona testing) एखाद्या व्यक्तीचे नाक किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज भासणार नाही. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्राच्या (NEERI) नव्या संशोधनानुसार आता कोरोना चाचणीसाठी व्यक्तीच्या थुंकीचे नमुने वापरले जातील. ICMR ने या संशोधनाला मान्यता दिली आहे. ‘निरी’ च्या नव्या चाचणी पद्धतीमध्ये व्यक्तीला सलाईनमध्ये वापरले जाणारे ग्लुकोज तोंडात घेऊन त्याच्या गुळण्या करावयास सांगितले जाते. ही गुळणी नंतर एका बाटलीमध्ये साठविण्यात येते, मग या थुंकीचा वापर आरटीपीसीआर टेस्टसाठी केला जातो. याने तीन तासांतच एखाद्या व्यक्तीला कोरोना आहे किंवा नाही ते समजू शकते.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement