SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘द फॅमिली मॅन 2’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रेक्षकांचा तोच उत्साह आणि प्रेम पाहून मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) ची मुख्य भूमिका असलेल्या ‘द फॅमिली मॅन’ चा दुसरा सीझन आणण्यात आला आहे. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अभिनेता मनोज वाजपेयीने मनोज वाजपेयीने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकून घेतली आहे.

‘द फॅमिली मॅन 2’ विषयी थोडक्यात..

Advertisement

गेल्या अनेक दिवसांपासून या सीरिजची चर्चा होती. 4 जून रोजी ही सीरीज रिलीज होणार असून नुकताच धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) या अ‍ॅक्शन स्पाय थ्रिलरमध्ये साहजिकच श्रीकांतच्या मुख्य भूमिकेत अभिनेता मनोज बाजपेयी झळकणार आहे. या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी हा कुटुंब, ऑफिस आणि देश या तिन्ही जबाबदाऱ्या एकत्र पूर्ण करताना दिसत आहे.

Advertisement

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीची (Samantha Akkineni) महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सीरिजच्या माध्यमातून समंथाने वेब विश्वात पदार्पण केलं आहे. यामध्ये ती रज्जी नावाच्या एका महिलेची भूमिका साकारत आहे.

धमाकेदार ट्रेलरचा व्हिडीओ पाहा : 

Advertisement

या व्यतिरिक्त सुचीच्या भूमिकेत प्रियमणी, शारीब हाश्मी, सीमा विश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Advertisement

‘द फॅमिली मॅन 2’च्या टीझरने देखील भरपूर वाहवा मिळवली. या टीझरमध्ये मनोजची बदललेली स्टाईल पाहायला मिळाली होती. या सीरीजमध्ये क्रूर दहशतवादी मुसाची भूमिका अभिनेता नीरज माधव यांनी साकारली होती. या भूमिकेसाठी नीरजला बरीच वाहवा मिळाली होती.

या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी हा ‘फॅमिली मॅन’ आहे. त्याला पत्नी आणि दोन मुलं आहेत. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच तो राष्ट्रीय तपास यंत्रणेत गुप्तपणे काम करत असतो. त्याच्या पत्नीला कामाबद्दल जराशी माहिती असते. या सगळ्यात त्याला दहशतवादी मिशनचा अलर्ट मिळतो. तो मिशन यशस्वी करण्यासाठी मनोज वाजपेयी काय करतो, यात त्याला कोणाची साथ मिळते यावर दहा एपिसोड्सची (Episodes) ही सीरिज आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

 

Advertisement