SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘म्युकॉरमायकोसिस’वर जळू ठरेल रामबाण?, वैद्यांनी व्यक्त केला विश्वास..!

कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये काळी बुरशी, अर्थात ‘मुकोरमाईकोसीस’ आजार आढळून येत आहे. काळी बुरशीचा वेगाने फैलाव होत असून, या विकाराने आरोग्य यंत्रणेपुढे एक मोठे आव्हान उभे केले आहे.

काळी बुरशी रोगावरील उपचारासाठी ‘जळू’चा उपयोग करता शकेल, असा विश्वास आयुर्वेदातील वैद्य व्यक्त करत आहेत. तसे प्रयोग करण्याची तयारी सुरु झाल्याचे समजते. अर्थात, सरकारने अशा उपचारांना संमती दिलेली नाही.

Advertisement

अनेक रोगावरील आयुर्वेदिक उपचारासाठी जळवांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तो यशस्वीही झाला आहे. आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी यांनीही हातात एक जळू धरलेली दिसते. त्यामुळे प्राचीन काळापासून उपचारात जळूचा वापर केला जात आहे. रक्त शोषणाऱ्या जळू किंवा जळवांचा शोध बिहारमध्ये डॉक्टर घेत आहेत.

माणसाच्या शरीरातील अशुद्ध रक्त शोषून, मृत पेशी नष्ट करण्याचे काम ही जळू करते. शरीरावरील त्वचा खराब झाली असेल, रक्तप्रवाह बंद पडला असेल, तर उपचारासाठी जळूचाच वापर केला जातो.

Advertisement

शरीरावर झालेली अनैसर्गिक वाढ, डोळे सुजणे, अशा विकारांवर आयुर्वेद उपचारात दीर्घ काळापासून जळूचा वापर केला जात आहे. डोळ्याजवळ रक्त साठले असेल, तर जळूद्वारे ते काढले जाते आणि त्वचा नॉर्मल होते. डोळ्याजवळ वाढणाऱ्या काळ्या बुरशीसाठी जळूचा असाच उपयोग करता येईल, असा विश्वास डॉक्टरांना आहे.

काही जळवा विषारी, तर काही बिनविषारी असतात. पैकी उपचारासाठी बिनविषारी जळवा वापरल्या जातात. या दोन्ही जळूमधील फरक सहज ओळखता येतो. विषारी जळू काळी, तर बिनविषारी हिरवट आणि चिकट त्वचा असलेली असते. तिच्या अंगावर केस नसतात. या जळूचा काळ्या बुरशीवरील उपचारासाठी वापर करता येऊ शकतो, असे मत वैद्यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

 

Advertisement