Take a fresh look at your lifestyle.

बलात्कार झाल्याचे पीडितेलाही कळले नाही, पहा कुठे घडलाय हा प्रकार..?

0

झोपेत असलेल्या महिलेवर एकाने अत्याचार केला. विशेष म्हणजे, त्यावेळी या पीडित महिलेचा पती तिच्या शेजारीच झोपलेला होता. मात्र, हा प्रकार दोघांच्या लक्षात आला नाही. घटनेनंतर आरोपीने तेथून धूम ठोकली.

मध्य प्रदेशमधील रीवा येथे ही घटना घडली. एका झोपडीवजा घरात 5 वर्षांच्या मुलासह पीडित महिला व तिचा नवरा राहतो. शुक्रवारी (ता.14) रात्री हे कुटुंब झोपलेले असताना, एका भामट्याने अंधाराचा फायदा घेत, त्यांच्या झोपडीत प्रवेश केला. नंतर त्याने महिलेवर बलात्कार केला.

Advertisement

विशेष म्हणजे, त्यावेळी तिच्या शेजारीच नवरा झोपलेला होता. नवरा बाजूला झोपल्याचे लक्षात आल्यावर महिलेने आरडाओरडा केला. त्या आवाजाने जाग्या झालेल्या तिच्या नवऱ्याने आरोपीला पकडलेही. मात्र, अंधाराचा फायदा घेत, आरोपी तेथून पसार झाला.

या घटनेनंतर दोन दिवसांनी पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

Advertisement

पीडित महिलेचे घर अतिशय छोटे आहे. त्यामुळे घरात आरोपी शिरल्याचे बाजूलाच झोपलेल्या नवऱ्याला कसे समजले नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. अज्ञात व्यक्तीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे.

दरम्यान, पीडित महिलेचा पती व या आरोपीचे जुने भांडण असल्याचे समजते. सध्या आरोपी फरार झाला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement

Leave a Reply