SpreadIt News | Digital Newspaper

स्वस्तात सोनेखरेदीची संधी, ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ सीरिजचा पहिला टप्पा आजपासून सुरु

सोन्यात गुंतवणूक आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार वेळोवेळी ‘सॉवरेन गोल्ड बाँड’च्या सीरिज जारी करते. त्यानुसार वित्त मंत्रालयानं आर्थिक वर्ष 2021-22 साठी मे ते सप्टेंबर दरम्यान सहा हप्त्यांमध्ये ‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड’ जारी केले जाणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign gold bond) सीरिजचा पहिला टप्पा आजपासून (ता. 17) सुरू झाला. पुढील पाच दिवस ग्राहकांना बाजारातील किमतीपेक्षा स्वस्तात सोनेखरेदीची संधी आहे.

Advertisement

‘आरबीआय’ने (RBI) त्यासाठी 4,777 रुपये सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव निश्चित केला आहे. जे ग्राहक ऑनलाईन अर्ज करतील आणि डिजीटल पेमेंट (Digital Payment) करतील, त्यांना प्रति ग्रॅममागे 50 रुपयांचा ‘डिस्काऊंट’ (Discount) दिला जाणार आहे.

दरम्यान, ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’वर (MCX) आज सोन्याचा वायदा 0.7 टक्क्यांनी वाढून 48,003 रुपये प्रति तोळा झाला. चांदीच्या दरातही 1.2 टक्क्यांची वाढ होऊन 71,940 प्रति किलोवर पोहोचले.

Advertisement

जागतिक बाजारात अमेरिकी डॉलर आणि ट्रेजरी यील्डमध्ये घसरण झाल्याने सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. त्यानुसार सोन्याचे भाव 0.6 टक्क्यांनी वाढून 1,852.39 डॉलरवर पोहोचले आहेत.

24 कॅरेट सोन्यासाठी आज दिल्लीत 10 ग्रॅमची किंमत 50220 रुपये होती. चेन्नईत 49660, कोलकाता 49930 रुपये, तर मुंबईत 46080 रुपये मोजावे लागत होते.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement