SpreadIt News | Digital Newspaper

काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅगलो व्हायरस नेमका आहे तरी काय? जाणून घ्या..

कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत केलेल्या संघर्षाचा शेवट झाला. दोन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं.

राजीव सातव यांना 19 एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोरोनाची लक्षणं दिसताच 22 एप्रिलला चाचणी अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळलं, मग 23 एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल केलं गेलं. काही दिवसांतच प्रकृतीत पुन्हा सुधारत असल्याची माहिती येऊ लागली. पण 25 एप्रिलनंतर प्रकृती खालावली आणि त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासोबतच सर्वच स्तरात दुःख व्यक्त होत आहे.

Advertisement

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन झाले, पण त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांच्या शरीरात सायटोमॅगलो व्हायरस (Cytomegalo virus) आढळून आला होता आणि प्रकृती अधिक खालावली गेल्याचं समजत आहे.

सायटोमॅगलो व्हायरस म्हणजे…

Advertisement

सायटोमॅगलो व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. सायटोमॅगलो (Cytomegalo virus) हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. हा विषाणू संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांकडे लाळ किंवा थुंकी द्वारे, रक्त व लघवीतून पसरतो. अमेरिकेतील 40 वर्ष पूर्ण असलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात तो आढळून येतो.

व्हायरसचा संसर्ग ‘असा’ होतो…

Advertisement

प्राप्त माहीतीनुसार या व्हायरसच्या संसर्गामुळे त्या व्यक्तीची दृष्टी जाऊन अंध होऊ शकते, तसंच रेटिनावर देखील परिणाम होतो. तसंच फुफ्फुसांत पण याचं इन्फेक्शन होते.

या आजारामुळे रुग्णांना डायरियाचा त्रास होणे तसंच मेंदूमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो. गरोदर महिलांच्या शरीरात याचं प्रमाण अधिक असतं, अशा महिलांची गर्भपात होण्याची शक्यता देखील जास्त प्रमाणात असते, अशी माहीती आहे.

Advertisement

या विषाणूच्या संसर्गामुळे तोंडावर किंवा तोंडाच्या आतील भागात, ओठावर फोड येतात. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते. त्यांच्यासाठी हा विषाणू घातक ठरु शकतो. स्तनपान करणाऱ्या आईपासून बाळाला देखील याची लागण होत असल्याचं कळतंय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement