कोरोनामुळे शेअर बाजारात सतत चढ-उतार पहायला मिळत आहेत. मागील आठवडाभरात टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. फक्त ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ आणि ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ यांचाच फायदा झाला.
टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी सारख्या मोठ्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण दिसून आली. विशेष म्हणजे, ईदच्या दिवशीही बाजारात मंदी राहिली. शाॅर्ट ट्रेंडिग डेच्या आठवड्यात BSE Sensex तब्बल 473.92 अंक म्हणजेच 0.96 टक्क्यांनी घसरला.
आठवडाभरात 8 प्रमुख कंपन्यांची मार्केट कॅप घसरली. त्यात टीसीएस मार्केट कॅप 30054.79 कोटी रुपयांवरून 1128488.10 कोटी रुपये झाली.
इन्फोसीसची मार्केट कॅप 15168.41 कोटी रुपयांनी घसरून 561061.44 कोटी रुपयांवर गेली.
एचडीएफसी बँकेची मार्केट कॅप 15139.12 कोटी रुपयांवरून 765035.39 कोटी रुपयावर गेली.
कोटक महिंद्रा बँकेची मार्केट कॅप 14398.04 कोटी रुपयांनी घसरून 338358.80 कोटीवर गेली.
एचडीएफसी एमसीएपीची मार्केट कॅप 13430.38 कोटीवरून 436879.75 कोटी रुपये झाली.
बजाज फायनान्सची मार्केट कॅप 9844.62 कोटी रुपयांनी घसरून 321592.05 कोटीवर गेली.
हिंदुस्थान यूनिलिव्हरची मार्केट कॅप 8505.43 कोटी रुपयांनी घसरून 558445.28 कोटी झाली.
आयसीआयसीआय बँकेची मार्केट कॅप 6533.78 कोटी रुपयांनी घसरून 413243.07 कोटीवर गेली.
..तर याउलट रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 3518.62 कोटी रुपयांनी वाढून 1227855.04 कोटी रुपये झाले. तर स्टेट बँक ऑफ इंडिया एमसीएपी 2052.66 कोटी रुपयांनी वाढून ३२१७३२.२५ कोटी रुपये झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज टॉप 10 कंपन्यांच्या यादीत सर्वात मूल्यवान ठरली आहे.