SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतात ‘हे’ स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन आले, किंमत आहे खूपच कमी!

भारतीय बाजापेठेत 5जी स्मार्टफोनची किंमत आधी सामान्यांना न परवडणारी होती, पण आता सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये 5G स्मार्टफोन्स उपलब्ध झाले आहेत. तुम्हाला जर स्वस्तात मस्त (5G Smartphone) 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर अधिक जाणून घ्या..

रिअलमी 8 –

Advertisement

रिअलमी8 (realme 8) 5जी स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी आहे. याची किंमत भारतात 13,999 रुपये आहे. तसेच ये 6.5 इंचचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, डायमेंसिटी 700 5जीचा प्रोसेसर, स्मार्टफोनच्या मागच्या पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप, B&W कॅमेरा आणि मॅक्रो लेन्ससह व नाईट स्केप फिल्टरसह 48 एमपी प्रायमरी कॅमेराचा सपोर्ट, एक 16 एमपी सेल्फी कॅमेरा, साइड माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. पॉवरफुल 5000mAh बॅटरी आहे, जी 18 डब्ल्यू फास्ट चार्जरने चार्ज करता येईल.

रिअलमी नार्झो 30 प्रो –

Advertisement

अँड्रॉइड 10 ओएस वर आधारित रिअलमी नार्झो 30 प्रो मध्ये मीडियाटेक (Mediated) डायमेन्सिटी 800 यू प्रोसेसरवर काम करतो. 6.5 इंचचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, फोनमध्ये 5000 ची बॅटरी, जी 30 डार्ट चार्ज सपोर्टसह, फोनचा कॅमेऱ्याचा प्राथमिक सेन्सर 48 एमपी, त्यात 8 एमपीचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 एमपी मॅक्रो शूटर आहे. व्हिडिओ कॉलिंग (Video Calling) आणि सेल्फीसाठी (Selfie) फोनमध्ये पंच होल कटआउटसोबत 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. याची किंमत 16,999 आहे.

मी 10 आय –

Advertisement

शाओमीचा मी 10आय (MI 10i) स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजची किंमत 20,999 रुपये आहे. 6.67 इंच फुल एचडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर, एमआययूआय 12 ऑपरेटिंग, स्मार्टफोनमध्ये 4,820 mAh बॅटरी आहे. स्मार्टफोनमध्ये शाओमीने राउंड शेप क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे, प्रथम 108 एमपी सॅमसंग एचएम 2 सेन्सर, दुसरा 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा, तिसरा 2 एमपी मॅक्रो लेन्सचा तर चौथा एक 2 एमपी डीप सेन्सर आहे. फोनच्या पुढच्या बाजूस 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटो जी –

Advertisement

मोटो जी (Moto G) 5जी मध्ये 6.7 इंचचा फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी पॅनेल, 5000 एमएएच बॅटरी, फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप ज्याचा प्राथमिक कॅमेरा 48 एमपीचा तर 8 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो लेन्स, सेल्फीसाठी 8 एमपीचा कॅमेरा दिला आहे. मोटो जी हा 5G स्मार्टफोन 20,999 रुपयांना ऑनलाईन विकला जात आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 75 जी चिपसेटसह येईल. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा सपोर्ट मिळेल.

(महत्वाचे: सदर स्मार्टफोन्सच्या किंमती या प्राप्त माहीतीनुसार घेण्यात आल्या आहेत. त्यात कंपनीने देऊ केलेल्या ऑफर्सनुसार कमी अधिक बदल होऊ शकतात.)

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement