Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रेल्वेतील जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनल या शब्दांचा अर्थ काय? जाणून घ्या!

0

भारतीय रेल्वे नेटवर्क जगातील सर्वाधिक मोठे असे नेटवर्क मानले जाते. भारतामध्ये अनेक छोटी-मोठी गावे देखील रेल्वेने जोडलेली आहेत. त्यामुळे सी रेल्वेला जीवनवाहिनी असेही म्हटले जाते.

भारतात रेल्वे आल्यानंतर दळणवळणासहीत बाजारपेठा आणि व्यापार देखील मोठ्या प्रमाणात वाढले. याच रेल्वे विषयी अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्याला माहित नसतात रेल्वेचे जंक्शन, सेंट्रल किंवा टर्मिनल या शब्दाचा अर्थ देखील बऱ्याच लोकांना माहीत नसतो. आपण रेल्वेने प्रवास करत असाल तरीदेखील या गोष्टी नेमक्या काय आहेत याची जाणीव आपल्याला नसते. आज या लेखामधून आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत.

Advertisement

जंक्शन : ज्या रेल्वेस्थानका मधून वेगवेगळ्या तीन ते चार ठिकाणांवरून रेल्वे येतात किंवा तीन ते चार ठिकाणावरून तुम्ही रेल्वेतून जाऊ शकता, अशा जागेला जंक्शन म्हणतात. देशामध्ये 300 पेक्षा अधिक रेल्वे जंक्शन आहेत. यात मथुरा हे सर्वात मोठे जंक्शन आहे.

सेन्ट्रल : शहराच्या मध्यभागी आणि सर्वात जुने जे रेल्वे स्थानक आहे त्याला सेंट्रल म्हणतात. या रेल्वे स्थानकावर वर्दळ जास्त असते आणि रेल्वेस्थानकावर असणाऱ्या सुविधा न पेक्षा जास्त सुविधा इथे असतात. जास्त रेल्वेगाड्या देखील याच स्थानकावर येत-जात जात असतात.

Advertisement

टर्मिनल : टर्मिनस किंवा टर्मिनल हा शब्द आपण अनेकदा ऐकतो मात्र, त्याचा अर्थ फार कमी जणांना माहीत असतो. टर्मिनल म्हणजे शहराच्या शेवटच्या बाजूस असलेले स्थानक! इथून पुढे कोणतेही रेल्वे स्थानक तुम्हाला त्या शहरातुन मिळणार नाही. देशात एकूण 27 टर्मिनल आहेत.

स्टेशन : वरील कोणत्याच प्रकारात जे रेल्वेस्थानक मोडत नाही त्याला स्टेशन म्हणतात. त्यामुळे कधीही रेल्वेने प्रवास करताना रेल्वे टर्मिनल, सेंट्रल, जंक्शन किंवा स्टेशन यापैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर आहे, हे ओळखण्याचा हा सोपा मार्ग आहे. अनेकदा आपण रेल्वे स्टेशन म्हणून विषय सोडून देतो. मात्र, रेल्वे या वेगवेगळ्या प्रकारातील स्थानकावर थांबते, याची आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement

Leave a Reply