SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘म्युकरमायकोसिस’चा नगरमध्ये पहिला बळी, रुग्णांची अशी घ्या काळजी..!

कोरोनाने आधीच छळले असताना त्यात आता ‘म्युकरमायकोसिस’ (Mucormycosis) आजाराची भर पडलीय. नगर जिल्ह्यात या आजाराचा पहिला बळी गेला असून, आणखी एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.

या आजाराची लक्षणे काय आहेत, तो कसा रोखला जाऊ शकतो, याबद्दल खुद्द केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सूचना केल्या आहेत.

Advertisement

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे ‘म्युकरमायकोसिस’चे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यातील ३५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, नगर जिल्ह्यातील हा पहिलाच बळी ठरला आहे. तसेच ५५ वर्षीय महिलेवर नगर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ट्विटर (Twitter) वर डॉ. हर्षवर्धन यांनी या आजाराची लक्षणे आणि उपाययोजना सुचवल्या आहेत. कोरोनावर उपचार करताना वापरल्या जाणाऱ्या ‘स्टेरॉइड’ (steroids) मुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. श्वास घेताना ‘युब्युक्युटस’ नावाचे जीवाणू नाकातुन आत जातात.

Advertisement

रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल, तर ‘म्युकरमायकॉसिस’ या बुरशीची वाढ होते. मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता अधिक असते.

‘म्युकरमायकॉसिस’ची लक्षणे

Advertisement
 • चेहऱ्यावर सूज येणे
 • गाल दुखणे
 • डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे
 • डोके दुखणे, नाक दुखणे
 • रक्ताळ किंवा काळसर जखम

काय कराल..?

 •  ‘हायपरग्लाइकेमिया’ (hyperglycemia) नियंत्रित करा.
 • मधुमेही आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी ‘ग्लुकोज’ स्तराचे निरीक्षण करावे.
 • निर्णायकपणे ‘स्टेरॉइडस’ वापरा
 • ऑक्सिजन थेरपीदरम्यान ह्युमिडिफायर्ससाठी स्वच्छ, निर्जंतुकीकरण पाण्याचा वापर करा.
 • अँटी बायोटिक्स (Anti Bio ticks) / अँटी फंगल (Anti fungal) योग्य पद्धतीने वापरा.

काय टाळाल..?

Advertisement
 • कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
 • बंद नाक आणि ‘सायनस्टिक बॅक्टेरिया’च्या रुग्णांना गृहित धरू नका.
 • बुरशीजन्य ‘एटिओलॉजी’ शोधण्यासाठी योग्य चाचण्या करा
 • ‘म्युकरमायकोसिस’वर उपचारासाठी वेळ दवडू नका.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement