लॉकडाऊनमुळे जवजवळ सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. मग परिस्थिती निवळल्यावर जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर खूपच थोड्याशा गुंतवणुकीत मोत्यांची शेती करणं हा त्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल.
मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण आणि अनुदान
या व्यवसायासाठी सरकारकडून 50 टक्क्यांपर्यंत सबसिडीही मिळते. त्यामुळे मोत्यांची शेती करणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. अनेक जण मोत्यांच्या शेतीतून लाखो रुपये कमवत आहेत.
मोत्यांसाठी लागणारी शिंपले (Oysters) बऱ्याच राज्यांत मिळतात. मोत्यांच्या शेती करण्यासाठी एक तलाव (Pond), मोत्यांचं बीज, प्रशिक्षण (Training) यांची गरज असते. आपण तलाव स्वखर्चाने खोदू शकतो. यासाठी सरकार 50 टक्के सबसिडीही (Subsidy) देतं, त्याचाही आपल्याला लाभ घेता येऊ शकतो.
दक्षिण भारतात आणि बिहारमधल्या दरभंगा येथे इथल्या शिंपल्यांचा दर्जा चांगला असतो. भारतात मोत्यांच्या शेतीचं प्रशिक्षण अनेक संस्थांमध्ये मिळते. मध्य प्रदेशात होशंगाबाद व मुंबईतही मोत्यांच्या शेतीचं प्रशिक्षण (Pearl Farming) देणाऱ्या संस्था आहेत.
मोत्यांची शेती कशी करायची?
सर्वात प्रथम शिंपले एका जाळीत बांधून 10 ते 15 दिवस तलावामध्ये टाकले जातात.
शिंपले स्वतःसाठी अनुकूल वातावरण तयार करतात. त्यानंतर ते बाहेर काढून त्यांची छोटीशी सर्जरी केली जाते.
मग या सर्व शिंपल्यांचं तोंड उघडून त्यामध्ये वाळूचा एक कण टाकतात. त्यावर शिंपल्यातला जीव स्रावांची अनेक आवरणं तयार करतो. त्यातूनच हळूहळू नंतरमोती तयार होत जातो.
एक मोती तयार होण्यासाठी कमीत कमी 25 ते 35 रुपये खर्च येतो. एका शिंपल्यातून साधारणतः दोन मोती तयार होतात, तर एका मोत्याला (Pearl) अंदाजे 120 रुपये दर मिळतो. मोत्याचा दर्जा चांगला असेल, तर 200 रुपयांहूनही जास्त किंमत एका मोत्याला मिळू शकते.
एक एकर क्षेत्रावरच्या तलावात 25 हजार जरी शिंपले टाकले, तरी त्यासाठी 8 लाख रुपये खर्च येईल. त्यातील 50 टक्क्यांहून जास्त शिंपले सुरक्षित पद्धतीने हाती लागतील. त्यातून वर्षाला साधारणतः 30 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u