हमासने मागील काही दिवसात इस्रायलवर जवळपास 1200 हून अधिक रॉकेट हल्ले केले असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. यापैकी 400 रॉकेट्स गाझा पट्टीमध्येच पडली. इस्रायलच्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीम या प्रणालीने सुमारे 100 रॉकेट्स आकाशातच निकामी केले, अशी माहीती आहे.
इस्त्रायलची आयर्न डोम सिस्टम ही जगातील सर्वोत्कृष्ट क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. या व्यवस्थेमध्ये रॉकेट्स, मोर्टार शेल, यूएव्ही आणि क्षेपणास्त्र हवेत सोडले जाऊ शकतात. हेच कारण आहे की, हमासने इस्त्रायलच्या दिशेने 300 हून अधिक गोळे फेकले, त्यापैकी केवळ 1 डझन जमिनीवर पडल्याचं कळतंय.
काय आहे आयर्न डोम?
इस्रायलने 2006 मध्ये या प्रणालीवर काम सुरू केले, जेव्हा इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात युद्ध चालू होते आणि दहशतवादी हिज्बुल्ला संघटनेने इस्रायलच्या शहरांमधील लेबनीज भूमीवरुन हजारो गोळे फेकले होते, ज्यामुळे इस्रायलचे बरेच नुकसान झाले, यानंतर, आयर्न डोम सिस्टमचा शोध लागला.
आयर्न डोम ही इस्रायलची लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे हाणून पाडण्याची प्रणाली आहे. ही एक शॉर्ट रेंज, ग्राउंड-टू-एयर, एअर डिफेन्स सिस्टम आहे ज्यात एक रडार आणि तामिर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. याचा वापर रॉकेट, तोफ (सी-रॅम) तसेच विमान, हेलिकॉप्टरचा प्रतिकार करण्यासाठी केला जातो. याच्या क्षेपणास्त्रामध्ये अशी यंत्रणा आहे की, जर डोमच्या क्षेपणास्त्राने थेट शत्रूच्या क्षेपणास्त्राला धडक दिली नाही तर ती जवळच 10 मीटर फुटते आणि त्यामुळे शत्रूचे क्षेपणास्त्र हवेत नष्ट होते.
किंमत किती?
ही संपूर्ण यंत्रणा खूप महाग आहे. बॅटरीमधल्या 4 क्षेपणास्त्रांची किंमत 7.3 कोटी असू शकते. प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत 59 लाख रुपये असल्याची माहीती आहे; परंतु हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वस्त रॉकेटची किंमत अंदाजे फक्त 1 लाख रुपये आहे. ही प्रणाली प्रत्येक धोका टाळण्यासाठी 2 क्षेपणास्त्रांचा वापर करते, म्हणजे ही यंत्रणा अचूक पण महागही आहे.
आयर्न डोम कार्य कसं करते?
पहिली गोष्ट म्हणजे एक शक्तिशाली रडार जो वेळेत आकाशातील सर्वात लहान वस्तूही पाहून अलर्ट जारी करतो. ही यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने काम सुरु करते.
ही यंत्रणा सुरु झाल्यानंतर मोठ्याने भोंगे वाजू लागतात. जेव्हा ही यंत्रणा सुरू केली जाते, तेव्हा पुन्हा पुन्हा फायर करण्याची परवानगी दिली जात नाही. हे स्वतःच कार्य करते.
ही यंत्रणा क्षेपणास्त्र बॅटरीशी जोडलेली आहे, जी अलर्ट संदेश मिळाल्यानंतर जो हवेतच धोका ट्रॅक करते आणि हवेतच खाली पाडते. इस्रायलने आपल्या प्रत्येक मोठ्या शहरात या व्यवस्थेचे जाळे पसरले आहे.