कोरोना (corona) झाल्यावर उपचारासाठी 14 दिवसांचा अवधी लागतो. लक्षणं असलेल्यांसाठी हा काळ अधिक कठीण (crucial) असतो. मात्र, ‘कोरोनाग्रस्त मृत्यूशय्येवर उठून बसला आणि ओम ओम असे बोलू लागला’ असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला धडकी भरेल ना?
मध्यप्रदेश च्या अशोक नगर येथे असे घडले आहे. अनिल जैन नावाच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू झाले. 15 दिवसांनी त्यांचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला.
उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने घरातील लोक मोठ्या धक्क्यात होते. त्यांचा मृतदेह कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार (last rites) होतात त्या स्मशानभूमीत नेण्यात आला. अंत्यसंस्कार सुरू झाले आणि ही व्यक्ती चितेवर उठून बसली.
काही लोक घाबरले कारण उठून बसत त्याने ओम ओम असा जप सुरू केला. त्यांच्या भावाने अम्ब्युलन्स (ambulance) पुन्हा हॉस्पिटलमध्ये (hospital) नेली. तिथे डॉक्टरांनी त्यांना ते मृत होते म्हणूनच आम्ही तसे घोषित केले असे सांगितले.
नातेवाईकांच्या आग्रहाखातर पुन्हा त्यांना तपासण्यात आले. त्यावरही ते मृत आहेत असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, या प्रकाराने त्यांचे नातेवाईक डॉक्टर आणि हॉस्पिटल च्या बेजबाबदार वर्तवणुकीतून आमचा नातलग गेला असे बोलत आहेत.
हा प्रकार वाटतो तेवढा सोपा नाही. ती व्यक्ती चितेवर उठून बसली असे म्हणणारे लोक आहेत. ती व्यक्ती मृत होती असे डॉक्टर सांगत आहेत. मात्र, या घटनेने अशोक नगर परिसरात खळबळ उडाली आहे. लोक साशंक झाले आहेत.
तो व्यक्ती जिल्हा रुग्णालयात दाखल होता. त्यामुळे सिव्हिल सर्जन ने सर्व आरोप फेटाळत ती व्यक्ती मृतच होता असे स्पष्ट केले आहे.