SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्सॲप च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार न करणे पडू शकते महागात; ॲप वापरणे होणार कठीण!

काही काळापूर्वी व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसी मध्ये होणारा बदल आणि त्याद्वारे युजर्स चा डेटा ॲप कडे जाणार आणि युजर्सची प्रायव्हसी धोक्यात येणार अशा प्रकारच्या बातम्या आपण सर्वांनीच वाचल्या आहेत.

व्हॉट्सॲप वापरणे बंद करावे लागणार म्हणल्यावर आणि प्रायव्हसी धोक्यात येणार असे चर्चेला विषय समोर आल्यानंतर व्हाट्सॲप ने असे काहीही होणार नसल्याचे सांगितले होते.

Advertisement

मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा व्हाट्सअप नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी युजर्सना नोटिफिकेशन पाठवत आहे. ही पॉलिसी स्वीकारली नाही तर, अनेक सेवा वापरताना युजर्सना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कोणत्या राज्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात ते आपण पाहूया.

प्रायव्हसी पॉलिसी मध्ये केलेले मॉडिफिकेशन स्वीकारले नाहीत तर व्हॉइस कॉल स्वीकारणे किंवा करणे, त्याचबरोबर व्हिडीओ कॉलिंग करणे किंवा स्वीकारणे, यासारख्या सुविधा देखील मिळवणे अवघड होऊ शकते. त्याचबरोबर युजर्सना चॅट लिस्ट बघणे देखील कठीण जाणार आहे. तुमचे कॉन्टॅक्ट व्हॉट्सॲप मध्ये दिसणे अवघड होऊन बसू शकते.

Advertisement

याच बरोबर तुम्हाला कोणी मेसेज केले आहेत, किंवा कॉल केले आहेत, याची माहिती देखील तुमच्या ॲप वर दिसणे कठीण होऊ शकते. हे सगळे टाळायचे असेल तर, व्हॉट्सॲपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारणे गरजेचे होणार आहे.

व्हॉट्सॲप लगेच वापरणे बंद होणार नसून काही काळासाठी व्हॉट्सॲप तुम्हाला नोटिफिकेशन पाठवत राहील जर तुम्ही स्वीकारले नाही तर, उद्यापासून म्हणजे 15 मे नंतर अनेक जणांना अशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Advertisement

यामुळे पुन्हा एकदा युजर्सचे प्रायव्हसी आणि त्यांचा डेटा जो कंपनी आपल्या यूजर्सचा वापरणार आहे. हा सगळा विषय ऐरणीवर आला आहे. युजर्सचा डेटा वापरून व्यापार करण्याच्या व्हॉट्सॲपच्या या नव्या धोरणाला सगळीकडून विरोध होत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement