कोरोना (corona) काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना रोजगारासाठी वणवण करणाऱ्या लोकांना त्याच बरोबर स्वतःमध्ये काहीतरी कला आहे असे वाटणाऱ्या मंडळींसाठी युट्युब (youtube) आता कमाईचा मोठा मार्ग घेऊन येत आहे.
कलाकार मंडळींसाठी देखील हा काळ अत्यंत कठीण परिस्थितीचा आहे टिक टॉक ॲप द्वारे आपली कला सादर करत होते. अशा लोकांना देखील एक वेगळा प्लॅटफॉर्म (platform) यातून मिळणार आहे.
भारतामध्ये टिकटॉक (tiktok) ला बंदी आल्यानंतर अनेक टिकटॉक स्टार रोजगाराच्या शोधात आहेत. टिक टॉक ला पर्याय अजून तरी उपलब्ध झालेला नसला तरी देखील, युट्युब (YouTube) मात्र लवकरच वापरकर्त्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे.
युट्युब ने शॉर्ट्स (shorts) नावाचे शॉर्ट व्हिडिओ फिचर लॉन्च केले आहे. याद्वारे वापरकर्ते स्वतःचे व्हिडिओज यावर टाकू शकतात आणि टिकटॉक प्रमाणे प्रसिद्ध होऊ शकतात.
युट्युबने याद्वारेच 100 मिलियन डॉलर्सचा फंड गोळा करायला देखील सुरुवात केली आहे. वापरकर्त्यांना मिळणारे व्ह्यूज आणि व्हिडिओजची प्रसिद्धी यावर युट्युब आता पैसे देणार आहे.
शॉर्ट या फिचरचे लॉन्चिंग झाल्यानंतर टिक टॉक ला ते टक्कर देईल की नाही यावर शंका निर्माण होत होती. मात्र, यातून पैसे कमावण्याचा मार्ग सोपा केल्याने तरुणांमध्ये युट्युब आणि त्याचे हे फिचर नक्कीच लोकप्रिय ठरेल असे म्हणता येईल.