SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक, कोरोनाबाधित 73 मृतदेह नदीतून काढले बाहेर…

कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमध्ये, देशातील काही शहरांमध्ये (Coronavirus in India) अशी एक घटना घडली ज्यामुळे धक्का बसेल.  

कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमध्ये, देशातील काही शहरांमध्ये (Coronavirus in India) अशी एक घटना घडली ज्यामुळे धक्का बसेल. बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये नदीतून कोरोनाबाधित 73 मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. बिहार सरकारच्या (Bihar Government) म्हणण्यानुसार, बक्सर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 73 मृतदेह गंगेमधून काढण्यात आले आहेत.  कोरोना विषाणूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  अंतिम अंत्यसंस्कार न केल्यामुळे हे मृतदेह  गंगा नदीत फेकल्या गेल्याची शक्यता आहे. आता चौसा गावातील महादेव घाट येथे जेसीबीने खणून हे मृतदेह पुरण्यात येत आहेत.

 

Advertisement

‘उत्तर प्रदेशातून हे मृतदेह वाहून आले’

बिहारचे जलसंपदा मंत्री संजयकुमार झा यांनी बक्सर जिल्ह्यातील चौसा गावाजवळील गंगा नदीत सापडलेल्या मृतदेहांबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, गेल्या  4-5  दिवसांत हे मृतदेह शेजारील उत्तर प्रदेशातून  (Uttar Pradesh)वाहून गेले आणि बिहारपर्यंत आले. मुख्यमंत्री नीतिश कुमार (Nitish Kumar) यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह मिळाल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एवढे मृतदेह सापडल्याने गंगा नदीच्या स्वच्छता आणि सुरळीत  प्रवाहाबद्दल नेहमीच चिंतेत आहेत. असंख्य मृतदेह वाहून आल्यामुळे याचा त्रास सहन करावा लागला आहे, असे मंत्री संजयकुमार झा म्हणाले.

Advertisement

 

‘राणीघाटजवळ जाळी लावली’

Advertisement

मुख्यमंत्री नीतिशकुमार (Nitish Kumar) यांनी जिल्हा प्रशासनाला नदीकाठी गस्त वाढवण्यास सांगितले आहे. जेणेकरुन पुन्हा पुन्हा अशी घटना घडू नये. झा यांनी ट्वीट केले की, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमेवर असलेल्या राणीघाटला गंगेमध्ये जाळे लावण्यात आले आहे. आम्ही उत्तर प्रदेश प्रशासनाला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. आमचे प्रशासनही लक्ष ठेवत आहे.  दरम्यान, बक्सरचे उपविभाग अधिकारी के. के. उपाध्याय यांनी सांगितले की, मंगळवारी उत्तर प्रदेशच्या बाजूने आणखी दोन मृतदेह सीमेवर लावलेल्या जाळ्याजवळ आले आहेत, त्यांच्या अंत्यविधीची व्यवस्था केली गेली आहे.

 

Advertisement

‘मृतांपैकी कोणी बिहारचे नाही’

जलसंपदा मंत्री संजयकुमार झा यांनी सांगिते की, सोमवारी बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील गंगा नदीत मोठ्या संख्येने मृतदेह दिसले. असा दावा केला गेला आहे की ही मृतदेह कोरोना पीडितांची आहेत. ज्यांचे मृतदेह कुटुंबातील सदस्यांनी गरिबीमुळे आणि अज्ञानाच्या अभावामुळे सोडून दिले होते. तसेच स्वत: कोरोना संसर्गाला बळी पडू नये, या भीतीने त्यांनी मृतदेह नदीत टाकून दिले. चौसाचे गटविकास अधिकारी अशोक कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, या मृतांपैकी कोणीही बक्सर जिल्ह्यातील रहिवासी नाही.

Advertisement