डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Dedicated Freight Corridor Corporation of India) या विभागात भारत सरकार रेल्वे मंत्रालयाने नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.
कोरोना काळामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असताना नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. ज्यूनियर एक्झिक्युटिव एक्झिक्युटिव आणि ज्युनिअर मॅनेजर या पदांसाठी 1074 जागा आहेत.
23 मे 2021 पर्यंत http://dfccl.com या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
पदे
– ज्युनिअर मॅनेजर – 111 पद
– एक्जिक्युटिव्ह – 442 पद
– ज्युनियर एक्जिक्युटिव्ह – 521 पद
– एकूण पद- 1074
शैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर मॅनेजर (Civil) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 टक्क्यांनी उत्तीर्ण पदवीधारक असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
– ज्युनिअर मॅनेजर – 18 – 27
– एक्जिक्युटिव्ह – 18 – 30
– ज्युनियर एक्जिक्युटिव्ह – 18 – 30
पगार
– ज्युनिअर मॅनेजर – 30,000 ते 1,20,000 रुपये प्रति महिना
– एक्जिक्युटिव्ह – 25,000 ते 68,000 रुपये प्रति महिना
– ज्युनियर एक्जिक्युटिव्ह – 50,000 रुपये प्रति महिना.
निवड प्रक्रिया
DFCCIL लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून ही निवड केली जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u