स्वतःचे घर किंवा बिजनेस साठी जागा मिळणे आणि तेही स्वस्तात हे स्वप्नवत वाटावे, इतका काळ आता बदलला आहे. तुम्ही देखील घरासाठी किंवा बिजनेस साठी कमर्शियल, रेसिडेन्शिअल या प्रकारातील कोणती प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा ठेवून असाल तर, पंजाब नॅशनल बँकेचा 15 मे रोजी होणारा लिलाव तुमच्यासाठीच आहे.
बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अनेक जण स्वतः जवळची प्रॉपर्टी तारण ठेवतात. कर्ज फेडू शकले नाही तर, असे लोक ती प्रॉपर्टी बँकेकडे ठेवण्यास पात्र ठरतात. काही काळाने बँक अशा प्रॉपर्टीचा लिलाव करते.
या लिलावामध्ये जो व्यक्ती योग्य ती किंमत लावून बोली जिंकतो, त्याला ती प्रॉपर्टी देण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये बऱ्याच वेळा स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची मोठी संधी असते.
10902 रेसिडेंशियल, 2469 कमर्शियल, 1241 इंडस्ट्रीयल आणि 70 अग्रीकल्चरल प्रॉपर्टीज यात असणार आहेत, अशी माहिती पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटद्वारे दिलेली आहे.
https://ibapi.in/ या लिंकवर जाऊन तुम्ही या लिलावाच्या संबंधीत सर्व माहिती मिळवू शकता. प्रॉपर्टीचे एकूण मोजमाप, फ्रिहोल्ड, लिडहोल्ड या प्रकारातील प्रॉपर्टी, आणि लिलावात सहभाग घेण्यासाठी बँकेत जाऊन माहिती मिळवणे इथपर्यंत सर्व यावर उपलब्ध आहे.
अशी संधी फार कमी वेळा येते. कमी पैशांमध्ये मोठी प्रॉपर्टी घेण्याची संधी पंजाब नॅशनल बँक आपल्या सगळ्यांना करता देत आहे. याद्वारे लिलावात बोली लावून तुम्हीदेखील कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त प्रॉपर्टी घेण्याचा नवीन अनुभव देऊ शकता. याद्वारे तुमचे पैसेही वाचतील आणि तुमच्या नावे एक चांगली प्रॉपर्टी देखील होईल. यावर स्वतःचे घर किंवा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला मार्ग मोकळा होऊ शकतो.