SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हे’ दोन रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची जास्त भीती; अधिक खबरदारी घेण्याची गरज; सीएसआयआरने केला दावा

कोरोनाने एप्रिल आणि मे महिन्यांत देशात रुग्णांची आकडेवारी वाढतच चालली आहे. आता संपूर्ण जगाला कळलंच आहे की, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने आपण किती खंबीर असायला हवं हे शिकवलं. नवीन कोरोना स्ट्रेन (New Corona Strain) म्हणजे अधिक धोकादायक आणि तितकीच आपली आरोग्य सुविधाही हतबल! हे जणू समीकरणच झालं आहे.

हा कोरोनाचा नवा स्ट्रेन किती धोकादायक आहे याची सत्यता आता समोर आली आहे. कोरोनाच्या विषाणूने जगात दहशत माजवल्यापासून सगळीकडे बऱ्याच प्रकारचे या विषाणूवर संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. आता आपण कोणत्या रक्तगटातील लोकांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका जास्त आहे, हे पाहूयात..

Advertisement

संशोधनावरून असं दिसून आलं की..

‘AB’ आणि ‘B’ रक्तगटातील लोकं बाकीच्या रक्तगटांतील लोकांपेक्षा कोरोनामुळे लवकर प्रभावित होतात, असा दावा कौन्सिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) ने केला आहे, म्हणून AB आणि B रक्तगटातील लोकांना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित असलेले जास्तीत जास्त लोकांचे रक्तगट AB आहेत. मग दुसऱ्या क्रमांकावर B रक्तगट असलेल्या लोकांना कोरोना संक्रमणाची लागण लवकर होऊन हे रुग्ण वाढत आहे.

महत्वाचं म्हणजे, हाय फायबरचा (High Fiber) समावेश असणारा आहार एंटी-इन्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) असतो, तो शरीरावर इंफेक्‍शनपासून होणाऱ्या हल्लापासून प्रतिबंधित करतो. जरी शाकाहारी जेवण खाणाऱ्या लोकांना संसर्ग झाला तरी रुग्णाची प्रकृती गंभीर होत नाही.

Advertisement

CSIR च्या या सर्वेक्षणांबद्दल वरिष्ठ चिकित्सक डॉ. एसके कालरा म्हणतात..

‘AB’ आणि ‘B’ रक्तगटातील लोकं बाकीच्या रक्तगटांतील लोकांपेक्षा कोरोनामुळे लवकर प्रभावीत होतात, हे जरी खरं असले तरी, ब्लड ग्रुपवरील हा सर्वे केवळ एक नमुना आहे.
साइंटिफिक रिसर्च पेपरवर याचा कोणताही रिव्यू झालेला नाही. त्यामुळे मग या रिसर्च पेपर शिवाय कमी लोकांमध्ये सर्वे करुन वेगवेगळ्या रक्त गटांमधील लोकांमध्ये संक्रमणाचे प्रमाण निश्चित केले जाऊ शकत नाही.

Advertisement

O रक्तगटाच्या लोकांमध्ये संक्रमणासाठी प्रतिकारशक्ती चांगली असते, हे आपण इतक्या लवकर सांगू शकत नाही. O रक्तगटाच्या लोकांवर या आजाराचा सर्वात कमी परिणाम होतो. या रक्तगटातील बहुतेक रूग्ण अत्यंत सौम्य लक्षणे दर्शवितात. यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वे करणे आवश्यक आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement