SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ही’ इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये घालतेय धुमाकूळ; करा फक्त एकदा चार्ज आणि फिरा नॉनस्टॉप 510 किमी

जगभरातील लोकांनी आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनात वावरण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे (Petrol-Diesel Price hike) लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) खरेदीवर जास्त जोर देत आहे. त्यामुळे 2021 मध्ये वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

बजेटनुसार गाडी खरेदी आधी होत असे; पण आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फायदा व खास वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, कोरियन कार उत्पादक कंपनी किआ कॉर्पोरेशनने (Kia Corporation / Automobile manufacturer) पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.

Advertisement

कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनीला युरोपमध्ये प्री-सेलच्या जबरदस्त ऑर्डर्स मिळत आहेत. या इलेक्ट्रिक कारला (Kia EV-6 Electric Vehicle) ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इतर देशांकडून 7000 युनिट्सच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. किआने (Kia Motors) गेल्या महिन्यात दक्षिण कोरियामधील एका डेडिकेटेड प्लॅटफॉर्मवर त्यांची ही क्रॉसओव्हर ईव्ही लाँच केली होती. या कारला लाँचिंगच्या दिवशीच 21,016 प्री-ऑर्डर्स मिळाल्या. एवढ्या मोठ्या प्रचंड ऑर्डरमुळे कंपनीने एक नवीन विक्रम केला आहे.

किआ ईव्ही 6 इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म बेसवर (ई-जीएमपी) आहे, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही EV6, EV6 GT-Line आणि EV6 GT सह तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार EV6 टू-व्हील ड्राइव्ह (2WD) आणि ऑल व्हील ड्राइव्हसह (AWS) सादर करण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, आगामी काळात या प्लॅटफॉर्मचा इतर मॉडेल्समध्येही विस्तार होईल. 2026 पर्यंत 7 इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याची किआची योजना आहे. ईव्ही 6 या ऑर्डरमधील पहिले मॉडेल आहे.

Advertisement

किआच्या इलेक्ट्रिक कारचे धुमाकूळ घालणारे फीचर्स

18 मिनिटात 80% चार्ज

Advertisement

Kia EV6 मध्ये 800 व्होल्टची चार्जिंग सिस्टम मिळेल, ज्याच्या मदतीने केवळ 18 मिनिटांत ही कार 10 वरुन 80 टक्क्यापर्यंत चार्ज केली जाऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार केवळ 4.30 मिनिटं चार्ज केली तरी ही कार किमान 100 किलोमीटरपर्यंत धावते. तर या कारची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 510 किमीची रेंज देते.

3.5 सेकंदात 100 किमी स्पीड पकडणार

Advertisement

किआ ईव्ही 6 ही कार 58kWh आणि 77.4kWh या दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये विकली जाते. या बॅटरीच्या मदतीने ही ईव्ही अवघ्या 3.5 सेकंदात 100 किमी प्रतितास इतका वेग पकडते.

आकर्षक डिझाईन

Advertisement

कारच्या फ्रंट पॅनलचे आधुनिक पद्धतीचे डिझाईन आहे. कारची हेडलाईट बारीक असून एलईडी पॅटर्नमुळे या कारला एक अनोखा लुक मिळाला आहे. ऑडिओ व्हिज्युअल आणि नेव्हिगेशन (AVN) स्क्रीन जी हायटेक आणि हाय डेफिनेशन क्वालिटीसह येते. Kia EV6 ची बॅटरी पॉवर या कारला विशेष बनवते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement