व्हॉट्सअॅप हे चॅटिंग (whatsapp) अॅप खूप प्रसिद्ध आहे. प्रत्येकाच्या फोनमध्ये हे अॅप मिळेलच मात्र, आपला फोन अनेकदा आपण कुठेही ठेऊन जातो.
आपल्या फोनमध्ये (Phone) असणारे आपले वैयक्तिक मेसेजेस कोणाला दिसू नयेत, असे प्रत्येकाला वाटते. आपल्या प्रिय व्यक्तींसोबत आपण जे बोलतो ते आपण इतरांसोबत शेअर (share) करू इच्छित नाहीत.
पण ते सुरक्षित कसे ठेवायचे किंवा कोणी फोन घेतला तरी त्या विशिष्ट अँप ला कसे लॉक लावायचे असे अनेक प्रश्न आपल्याला असतात.
आता व्हाट्सअँप इन अँप फिचर आणणार आहे जे तुमचे चॅट सुरक्षित ठेवेल. कसा कराल याचा वापर, जाणून घ्या!
1. सर्वात आधी तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप ओपन करा.
2. होम पेजवर उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करा.
3. त्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील, त्यापैकी Settings वर क्लिक करा.
4. आता तुमच्यासमोर Account चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
5. आता Privacy या पर्यायावर क्लिक करा.
6. Privacy वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील, त्यापैकी सर्वात शेवटी Fingerprint Lock असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन Unlock with fingerprint वर क्लिक करा.
7. आता तुम्हाला फिंगरप्रिंट रजिस्टर करण्यास सांगितंल जाईल.
8. फिंगरप्रिंट रजिस्टर या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिंगंरप्रिंट लॉक टाईम सेट करु शकता.
9. यामध्ये तुम्हाला तीन पर्याय मिळतील, तुमच्या सोयीनुसार तुम्ही Immediately, After 1 minute, After 30 Minutes या तीनपैकी एकाची निवड करु शकता.
10. यामध्ये तुम्ही Immediately हा पर्याय निवडलात तर अॅप बंद होताच तुमचं लॉक अॅक्टिव्हेट होईल. तर After 1 minute, After 30 Minutes यापैकी कोणताही एक पर्याय निवडल्यानंतर अनुक्रमे 1 मिनिट किंवा 30 मिनिटांनंतर तुमचं लॉक अॅक्टिव्हेट होईल.