SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घरबसल्या आपल्या एसबीआय (SBI) बँकेचे बचत खाते दुसऱ्या शाखेत स्थानांतरण करायचे आहे? मग फक्त एवढंच करा..

देशातील सर्वात मोठी आणि सर्वच जणांना परिचित असलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) होय. या स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे ऐन लॉकडाऊनमध्ये स्टेट बँकेच्या ग्राहकांना घरबसल्या बँकेची शाखा बदलता येणार आहे.

ग्राहकांना घरबसल्या स्टेट बँकेच्या SBI बचत खात्याची शाखा बदलायची असल्यास त्या शाखेचा ब्रँच कोड आवश्यक आहे. याशिवाय तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असणं गरजेचं आहे आणि ऑनलाईन बँकींग चालू हवं असलं पाहिजे.

Advertisement

अतिशय सोप्या पद्धतीने करायचं झालं, तर म्हणजे तुम्ही एसबीआय योनो (SBI YONO) ॲप किंवा एसबीआय योनो लाईट (SBI YONO Lite) च्या मदतीने देखील बँकेची शाखा बदलू शकता.

तुमचा मोबाईल नंबर बँक अकाऊंटसोबत लिंक असणं गरजेचं आहे. कारण ही प्रोसेस करताना आपल्या मोबाईलवर ओटीपी (OTP) येतो. ओटीपी शिवाय तुम्ही शाखा बदलू शकत नाही. आपल्याला माहीतच आहे की, सध्या कोरोना महामारीमुळे बँकेने जास्तीत जास्त काम ऑनलाईन करण्याचा ठरवलं आहे.

Advertisement

शाखा-बदल करण्यासाठी या पायऱ्या लक्षात घ्या..

▪️ प्रथम तुम्ही onlinesbi.com वर Log in करा.
▪️ तिथं ‘Personal Banking’ या पर्यायावर क्लिक करा. User Name आणि पासवर्ड टाकून एंटर करा.
▪️ यानंतर तुम्हाला ‘e-service’ असं दिसेल, त्यावर क्लिक करून ‘ट्रान्सफर सेविंग अकाऊंट’वर क्लिक करा.
▪️ मग तुमच्या अकाऊंटला सिलेक्ट करा
▪️मग ज्या बँकेत अकाऊंट ट्रान्सफर करू इच्छिता त्या ठिकाणचा ब्रँचचं नाव आणि IFSC कोड भरा व सबमिट करा.
▪️ सर्व तपशील बारकाईने पूर्ण वाचल्यानंतर खात्री करून घ्या.
▪️ रजिस्टर्ड झाल्यानंतर तुमच्या मोबाईन नंबरवर OTP येईल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement