SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अंत्यसंस्कार सुरू होणार, इतक्यात आजीबाईंनी उघडले डोळे; जिवंतपणी सरणावर जाता जाता वाचल्या!

कोरोना (corona) काळात स्मशानभूमीत (crematorium) जागा मिळणे देखील कठीण झाले आहे. दवाखाने फुल्ल झाल्याने, अनेकांना उपचार देखील व्यवस्थित मिळत नाहीत. कोरोनाने ‘दो गज की दुरी’ आपल्याला शिकवली मात्र, यातून अनेकदा विपरीत घडता घडता राहते याचा प्रत्यय बारामतीकर नुकतेच घेऊन बसले आहेत.

बारामतीत एका आजींना कोरोना झाला. तब्येत चांगली व्हावी म्हणून दुरून सेवा सुरू होती. घरीच त्या विलगिकरणात (quarantine) होत्या. घरच्या लोकांना जवळ जाणे शक्य नसल्याने सगळीच तारांबळ होत होती.

Advertisement

आजींचं वय (age) 76 वर्षे. त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने मुलं त्यांना अम्ब्युलन्स (ambulance) मध्ये घेऊन दवाखान्यात जात होते. अचानक आजीबाईंनी हालचाल थांबवली. रस्त्यात ही बाब घरच्यांना कळली.

दवाखान्यात जागा मिळते की नाही हा प्रश्न होताच! आजीबाई गेल्या असे वाटून मुलांनी सगळ्यांना फोनाफोनी सुरू केली. अम्ब्युलन्स घराकडे वळली. नातेवाईक (relatives) जमणे सुरू झाले. कोरोनाग्रस्त असल्याने आता सर्व लवकर उरकायचे असे ठरले.

Advertisement

कोरोनाची भीती आणि शासकीय नियम म्हणून सगळे दूर दूर थांबून आजीबाईंचा चेहरा बघू लागले. त्यांना नमस्कार करू लागले. मात्र, आता त्यांना स्मशानभूमीत न्यायची वेळ आली.

नातेवाईक आक्रोश करू लागले. सर्वांना त्यांची आठवण असाह्य झाली. असे म्हणतात की, कितीही रडलो तरी गेलेली व्यक्ती जाते ती पुन्हा येत नाही. मात्र, इथे झाले उलटे. नातेवाईकांची आर्त हाक ऐकू आली आणि आजीबाईंनी डोळे उघडले.

Advertisement

पुन्हा सगळे शांत आणि अवाक! जर त्या जिवंत होत्या तर हे मगाशी झालं ते काय होतं? तर ती कोरोनाची भीती होती. माणूस जिवंत आहे की नाही, हे देखील बघायला जवळची व्यक्ती घाबरते ही आजची वस्तुस्थिती आहे.

आजीबाई सरणावर जाता जाता वाचल्या.जर त्यांना जाग आली नसती तर? एक जीव हकनाक गेला असता. या प्रकाराची बारामतीत सगळीकडे चर्चा सुरू आहे. सुरक्षा आणि वैयक्तिक कारणानं त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

 

Advertisement