SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा

कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिस (Black Fungus) आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण ग्रस्त असल्याचे आढळून येत आहे.

वेळेवर निदान होऊन उपचार घेतले नाही तर थेट डोळे व मेंदूवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यात रुग्णांवर उपचारादरम्यान ॲम्फोटेरिसिन (Amphotericin) नावाचे इंजेक्शन दररोज 2 याप्रमाणे 7 दिवसात 14 द्यावी लागतात, याचा खर्चही मोठा असून सर्वसामान्य माणसाला परवडणारा नाही.

Advertisement

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले..

कोरोनावर उपचार करताना वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनसाठी डिस्टिल्ड वॉटर वापरले नसेल, तर रुग्णाच्या तोंडामध्ये फंगस तयार होऊ शकतात.

Advertisement

रुग्णाच्या ओठाच्या आतून काळे डाग (Black spots on the inside of the lips) पडतात व त्यानंतर श्वसनासह मेंदूवरही याचा गंभीर परिणाम होतो. ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही, त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य (Fungal) आजाराचे लक्षण आढळून येत आहे.

म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन (Injection) दखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी येत असून त्याची किंमत लवकरच निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल आणि याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

Advertisement

यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून राज्यातील एक हजार रुग्णालयात म्यूकरमायकोसिसवर मोफत उपचार (Free Treatment) करण्यात येतील. कोरोनाबाधितांनी या आजारामुळे घाबरून न जाता मधुमेह (Diabetes) असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार (Medication) करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement