देशात कोरोनाची (Corona) परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. राज्यात रूग्णांची संख्या वाढत आहे. तर रूग्ण संख्या वाढत असल्यामुळे औषधांची मागणी देखील वाढली आहे. कोरोनाग्रस्त (Corona Positive) रूग्णांना तर औषध दिलीचं जात आहेत, पण दुसरीकडे लोकं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी वेग-वेगळ्या गोळ्यांचं सेवन करत आहेत. त्यामुळे अनेकदा असं होतं आपल्याला हव्या त्या गोळ्या मिळणं अवघड होऊन बसतं.
आता तुम्हीच बघा..
समजा आपण मेडिकलमध्ये गेलो आणि आपल्याला 250 एमजीच्या डोसची (Dose) गरज आहे; पण मेडिकलमध्ये 500 एमजीचा डोस आहे.
मग आपल्या मनात शंका उत्पन्न होते की, अशावेळी आपण 500 एमजीची गोळी (500 mg) मधोमध तोडून म्हणजेच अर्धी करून खाऊ शकतो का? 500 एमजीची गोळी अर्धी करून खाणं खरंच आरोग्यासाठी (Health) चांगलं आहे की धोकादायक असू शकतं ? या अशा परिस्थितीत आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा का?
या सर्व प्रश्नांवर उत्तरं डॉ. प्रदीप चौरसिया म्हणतात..
‘ज्या गोळ्यामध्ये मध्य ठिकाणी रेघ (Line) असते, अशा गोळ्या आपण रेघेच्या खुणेमधून तोडून अर्ध्या करून खाऊ शकतो. ही रेघ त्यासाठीच असते.’
डॉक्टरांनी पुढेही सांगितलं की, ‘उदाहरणार्थ आपल्याला 500 एमजीची गोळी हवी असते, पण आपल्याकडे 1000 एमजीची गोळी आहे, तर आपण ती गोळी अर्धी करून खाऊ शकतो. यामुळे होतं असं की, ‘1000 एमजीची गोळी अर्धी करून खाल्यास ती 500 एमजीच्या गोळी प्रमाणे काम करते. त्यामुळे आता कोणती गोळी आपण अर्धी करून खाऊ शकतो’, हे समजलंच असेल.
तसेच, डॉ. प्रदीप चौरसिया यांनी हे देखील सांगितलं की, ‘मध्ये रेघ नसलेल्या गोळ्या आपण अर्ध्या करून खाऊ शकत नाही. त्यामुळे फक्त मध्ये रेघ असलेल्या गोळ्या आपण अर्ध्या करून खाऊ शकतो. शिवाय कॅप्सूल देखील अर्ध्या तोडून खाऊ शकत नाही’, असे ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u