लॉकडाऊन (lockdown) मुळे देशाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. आपली आरोग्य व्यवस्था मोडकळीस येत आहे. कोरोनाने (corona) आपल्याला गच्च जखडून ठेवले आहे. अशात अनेकांना वर्क फ्रॉम होम (work from home) मिळाले आहे, अनेक संस्था कायमस्वरूपी ही कामाची पद्धत स्वीकारत आहेत.
मात्र, हे नोकरी असणाऱ्यांसाठी, जे बेरोजगार आणि बेघर आहेत त्या लोकांचे काय? ज्यांचे रेशन आणि आधार कार्ड नाही त्यांचे काय? उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) या राज्यातील कानपुरमध्ये सुतारखाने येथे घडलेला एक प्रकार आपल्याला आपल्या देशातील भयावह परिस्थितीचे दर्शन घडवतो.
इथे एका दुधवाल्याकडून दूध रस्त्यावर सांडले. तो व्यक्ती तिथून निघून गेला. हा सामान्य प्रकार आहे. मात्र, त्यानंतर जे घडले त्याने मन दुःखी होते. तिथे एक बेघर आणि बेरोजगार तरुण व्यक्ती आला. तो गुडघ्यावर वाकला आणि रस्त्यावर सांडलेले दूध एका प्राण्याप्रमाणे चाटु लागला.
पेट की भूख बड़ी ही खराबजहां हमारा भारत देश करोना जैसी गंभीर महामारी से जूझ रहा वहीं कुछ लोग हमारे भारत देश में भुखमरी के कगार पर भी गुजर रहे ज हां ऐसा ही मामला कानपुर के सुतरखाना दूध मंडी में देखने को मिला जहां किसी दूध वाले का दूध गिर गया वही पेट का भूखा व्यक्ति दूध को पीने लगा pic.twitter.com/eu8M9SeDDr
Advertisement— TASVEER AAJ KAL NEWS (@GupttaManish) May 9, 2021
भुकेने व्याकुळ तो अन्नाच्या शोधात वणवण भटकत होता. लॉकडाऊन मुळे सर्वकाही बंद असल्याने त्याला कोठेच काही खायला मिळत नव्हते. कोरोनाच्या भीतीने लोक जवळपास सुद्धा भटकत नव्हते. अशात त्याला ते रस्त्यावर सांडलेले दूध (milk) अमृतच भासले असणार!
आपण कोरोना काळात स्वच्छता, हायजीन आणि सोशल डिस्टनसिंग अशा गप्पा मारताना, संसर्गाच्या भीतीपेक्षा पोटाची आग शमवणे किती महत्वाचे आहे हे या व्हिडीओ मधून आपल्याला कळते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्थानिकांनी या तरुणाची राहायची आणि खायची व्यवस्था केली. मात्र, या तरुणासारखे आणखी किती नागरिक भुकेसाठी व्याकुळ असतील? या विचाराने आपण कोरोना काळात काय गमावत आहोत याची जाणीव होते.