SpreadIt News | Digital Newspaper

गॅस सिलिंडरवर 800 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार; ‘असा’ घेऊ शकता लाभ..

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत असताना, एलपीजी ग्राहकांना एलपीजी सिलिंडरवर 800 रुपयांपर्यंत मोठी सूट मिळू शकते.

काय आहे पूर्ण ऑफर

Advertisement

पेटीएमने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना केवळ 9 रुपयांमध्ये 809 रुपयांचे गॅस सिलिंडर मिळू शकेल.

पेटीएमने अलीकडेच ही कॅशबॅक ऑफर दिली आहे. या कॅशबॅक ऑफरअंतर्गत, ग्राहक गॅस सिलिंडर बुक केल्यास त्याला 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. आपण 31 मे 2021 पर्यंत या पेटीएम ऑफरचा लाभ घेऊ शकता.

Advertisement

कोण लाभ घेऊ शकणार?

आता लक्ष द्या, ही ऑफर्स केवळ अशाच ग्राहकांसाठी आहेत जे प्रथमच एलपीजी सिलिंडर बुक करतील आणि पेटीएमद्वारे पैसे देतील.

Advertisement

जेव्हा तुम्ही एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) बुक कराल आणि पेमेंट (Payment) कराल तेव्हा तुम्हाला ऑफरखाली एक स्क्रॅच कार्ड मिळेल ज्याचे कॅशबॅक (Cashback) मूल्य 800 रुपये पर्यंत असेल.

पहिल्या एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर ही ऑफर आपोआप लागू होईल. या ऑफरचा लाभ किमान 500 रुपयांच्या पेमेंटवर लागू होईल.

Advertisement

कॅशबॅकसाठी, ग्राहकाला स्क्रॅच कार्ड (Scratch Card) उघडावे लागेल, जे आपल्याला बिल भरल्यानंतर मिळेल. ही कॅशबॅक रक्कम 10 ते 800 रुपयांपर्यंत असू शकते. आपल्याला हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत उघडावे लागेल, कारण त्यानंतर आपण ते आपण वैधता संपल्याने वापरु शकणार नाही.

ऑफरचा लाभ घ्या, प्रोमो कोडसाठी अर्ज करा

Advertisement

आपल्या मोबाईल फोनमध्ये पेटीएम (Paytm) डाउनलोड करा

आपल्या गॅस एजन्सीकडे सिलिंडर बुक करावे लागेल.
यासाठी पेटीएम अ‍ॅपमधील ‘शो मोअर’ वर (Show More) जा.

Advertisement

बिल भरण्यासाठी रिचार्जवर (Recharge) क्लिक करा. सिलेंडर बुक करण्याचा पर्याय दिसला की, आपला गॅस प्रदाता निवडा.

बुकिंग करण्यापूर्वी, एफआयआरएसटीएलपीजी प्रोमो कोड (FIRSTLPG PROMO CODE) लागू करावा लागेल. मग यानंतर पुढील 24 तासांत आपल्याला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल, जे 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

 

Advertisement