Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचे नाव बदलल्याने होणार महामारी दूर; ज्योतिष्याने सांगितला अनोखा उपाय!

0

कोरोना महामारी जीवघेणी आहे…, मुलींच्या बदलेल्या ड्रेसिंग स्टाईल मुळे कोरोना होतो… इथपासून ते कोरोना आजार अस्तित्वात नसून ही बनवाबनवी आहे इथपर्यंत… अनेक वेळा अनेकांनी विज्ञानाला फाटे देणारे विधानं करून जगाला संभ्रमात टाकले की, नेमके आपण जगत कोणत्या शतकात आहोत?

एकीकडे वैज्ञानिक, डॉक्टर्स (doctors), नर्सेस (nurses), पोलीस (police), कोरोना लढ्यात आपले योगदान देत आहेत. वेळप्रसंगी जीव देखील गमावत आहेत. लसीकरण, उपाययोजना, लॉक डाऊन याने कोरोना रोखण्यासाठी सचोटीने प्रयत्न केले जात आहेत. अशात आंध्रप्रदेश मधील अनंतपुर मधील एका ज्योतिष्याने कोरोनाला घालवण्याचा अजब उपाय सांगितला आहे.

Advertisement

एका ट्विटर युजरने हा उपाय ट्विट करत त्याची खिल्ली देखील उडवली आहे. यात हा ज्योतिष म्हणतोय की, “कोरोना या रोगाचे नाव बदलल्याने आपण कोरोनापासून सुटका करवून घेऊ शकतो.”

ते नाव कसे असावे? त्याचे स्पेलिंग (spelling) कसे असावे? याबाबत त्याने सल्ला दिला आहे. हा ज्योतिष स्वतःला अंकशास्त्रतज्ञ (numerologist) म्हणवतो. त्याने corona ऐवजी caronaa असे स्पेलिंग ठेवायला सांगितलं आहे. Covid-19 ऐवजी Covviyd-19 असे केल्याने कोरोना संपुष्टात येणार असल्याचे त्याचे भाकीत आहे.

Advertisement

जिथे जिथे कोरोना हा शब्द वापरला जाईल तिथे तिथे हे स्पेलिंग बदलून, आपण या महामारीला हरवू शकतो असे त्याने सांगितले आहे. अनेकांनी त्याला गांभीर्याने घेतले आहे तर, अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

एकाने नावात बदल करून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता येईल का? असा प्रश्न केला आहे. ज्या युजरने त्याच्या बॅनर चा फोटो शेअर केला आहे, त्याने देखील असे लोक जगात आहेत यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement

Leave a Reply