SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केंद्राकडुन गृहविलगिकरण नियमांत बदल; मास्क बदलण्याची वेळ ही केली निश्चित!

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या रोज 3-4 लाखांच्या (daily 3-4 lacs corona cases) घरात गेलेली असताना, मृत्यू दर देखील वाढत आहे. जगभरामध्ये भारताच्या या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

विविध देशांकडून भारताला आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने मदत देखील होत आहे. अत्यवस्थ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Advertisement

तर सौम्य लक्षण असणारे कोरोनाग्रस्त गृह विलगीकरणात आहेत. राज्यात तब्बल 37 लाख कोरोनाग्रस्त गृहविलगीकरणात आहेत. गृह विलगीकरण हा मार्ग स्वीकारताना काही नियम केंद्र सरकारकडून टाकले जातात.

मागच्या वर्षीसुद्धा गृह विलगीकरणात असणाऱ्या व्यक्ती सरकारने घातलेले काही नियम पाळून घरात राहू शकतात, असे सांगण्यात आले होते.

Advertisement

यामध्ये त्या व्यक्तीला स्वतंत्र खोली असावी, त्या खोलीला टॉयलेट बाथरूमची (attached toilet-bathroom) सोय असावी. त्या व्यक्तीचा घरातील इतर कोणाशीही संपर्क येणार नाही, अशा पद्धतीने गृह विलगीकरण असावे असे सांगण्यात आले होते.

या वर्षी वाढते रुग्ण संख्या पाहून विलगीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत असले तरी देखील, केंद्र सरकारने आपली नियमावली बदलली असून नुकतेच त्याविषयीचे पत्रक जारी केले आहे.

Advertisement

गृहविलगिकरणाचे बदललेले नियम पुढीलप्रमाणे

1. गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी खोलीला लागूनच स्वतंत्र स्नानगृहाची सुविधा असायलाच हवी.

Advertisement

2. गंभीर किंवा इतर आजार आणि वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृह विलगीकरणाची परवानगी द्यावी.

3. गृह विलगीकरणात पूर्णवेळ रुग्णांची काळजी घेणारी एक व्यक्ती असावी.

Advertisement

4. रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा रुग्णालयाबरोबर नियमित संपर्क असावा आणि त्यातून रुग्णाला जाणवणारी प्रत्येक गोष्ट रुग्णालयाला आणि डॉक्टरांना माहीत करून द्यावी.

5. रुग्णांनी घरात असतानाही तीन पदरी वैद्यकीय मास्क वापरायला हवा, आठ तासांनंतर हा मास्क बदलणे गरजेचे आहे.

Advertisement

6. कोरोना रुग्ण राहत असलेल्या खोलीत हवा खेळती राहिली पाहिजे याची विशेष खबरदारी घ्यावी.

7. रुग्ण राहत असलेल्या रूमच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. टेबलचा (Table) पृष्ठभाग, दाराच्या कड्या, हॅण्डल (Handle) यासारख्या गोष्टी फिनाईलने स्वच्छ करणं गरजेचं!

Advertisement

8. गृह विलगीकरण दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला कोणताही त्रास नसल्यास रुग्णाचे विलगीकरण संपेल.

9. रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन घेऊ शकते.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

 

Advertisement