SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वर्क फ्रॉम होम’ चा गुगलचा असा हि फायदा…

गुगल (Google) कर्मचार्‍यांना अन्न, करमणूक आणि सोई पुरवण्यासाठी बरेच पैसे खर्च केले जातात. पण, सध्या वर्क फ्रॉम होम (work from home) असल्यामुळे हे भत्ते आता कर्मचार्‍यांना दिले जात नाहीत. त्यामुळे कंपनीकडे बरेच पैसे शिल्लक आहेत.

Work from home कोरोनामुळे संपूर्ण जगात ‘घरातून काम करण्याचा’ ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे आता कर्मचार्‍यांवर होणाऱ्या खर्चात कपात झाली आहे. भारतीय कंपन्यांसह जगातील सर्व मोठ्या कंपन्या पूर्वीच्या तुलनेत ऑपरेशनल आघाडीवर कमी खर्च करीत आहेत. दिग्गज तंत्रज्ञान कंपनी गुगलनेही वर्क फ्रॉम होम काम केल्यामुळे गेल्या एका वर्षात 7400 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

Advertisement

कर्मचार्‍यांच्या करमणूक व सोयीसाठीच्या खर्चात कपात
गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये जाहिरात आणि प्रमोशनल (Advertising and promotional) खर्चात 1.4 अब्ज डॉलर्सने घट झाली आहे. कंपनीने कोरोनादरम्यान खर्च कमी केला, कँपेन थांबवली किंवा शेड्यूल केली. काही इव्हेंट्स केवळ डिजिटल (Digital) स्वरूपात रूपांतरित करण्यात आले. अशा परिस्थितीत, प्रवास आणि करमणूक खर्चात 371 दशलक्ष डॉलर्स वाचले आहेत.

वर्क फ्रॉम होममुळे कर्मचार्‍यांच्या भत्त्यात कपात
गुगल कर्मचार्‍यांच्या करमणुकीसाठी आणि त्यांच्या सोईसाठी खूप खर्च करते. Google वर, कर्मचार्‍यांना अन्न, मनोरंजन आणि सोई पुरवण्यासाठी बरेच पैसे खर्च केले जातात. पण, आता घरातून काम असल्यामुळे हे भत्ते आता कर्मचार्‍यांना दिले जात नाहीत. त्यामुळे कंपनीकडे बरेच पैसे शिल्लक आहेत. दरम्यान, Google या वर्षाच्या अखेरीस पुन्हा कार्यालयात काम सुरू करण्याचा विचार करीत आहे. मुख्य वित्तीय अधिकारी रूथ पोराट यांनी गुंतवणूकदारांना सांगितले की कंपनी पूर्वीपेक्षा कमी कर्मचारी असलेल्या ‘हायब्रीड’ मॉडेलची योजना आखत आहे. सोबतच गूगल जगभरातील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक (Investing in real estate) कमी करणार नाही, असेही पोराट म्हणाले.

Advertisement