SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या अकाऊंटमध्ये येणार नाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता; यादीमध्ये नाव येण्यासाठी ‘या’ चुका आजच सुधारून घ्या..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता सरकार लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात हस्तांतरित आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या (Beneficiaries) बँक खात्यावर हस्तांतरीत केले जातात.

1 एप्रिलपासून शेतकऱ्यांचा हप्ता थकीत

Advertisement

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आठवा हफ्ता लांबणीवर पडला होता. आता कोविड -19 मुळे सरकार त्यांच्या नियंत्रणामध्ये व्यस्त आहे.

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन ट्रान्सफर केले जाते. दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत 10.82 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सुमारे 1,16,292.9 कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत.

Advertisement

तुमचा हफ्ता का रखडू शकतो?

अनेक कागदपत्रामध्ये आणि नावात एखादी छोटी-मोठी चूक असल्याने तुमचे पैसे रखडू शकतात. म्हणून तुम्ही हप्ता येण्यापूर्वीच कोणतीही चूक असेल तर स्वत: ती दुरूस्त करा किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर सुद्धा जाऊन सुधारणा करू शकता.

Advertisement

तुम्ही पीएम किसानच्या (PM Kisan) अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले स्टेटस चेक करू शकता. तेथे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते दिले गेले, पुढील हप्त्याची काय स्थिती आहे, जर एखादा हप्ता रखडला गेला, तर त्यामागचं कारण काय आहे, माहितीमध्ये काही कमी असेल, तर आहे तर तुम्ही ती सुधारू शकता.

‘या’ लोकांच्या खात्यात येणार नाहीत हप्त्याचे पैसे-

Advertisement

▪️ अर्ज करताना आपला आधार नंबर दिला नसेल किंवा चुकीचा दिला असेल तर पैसे येणार नाहीत.

▪️ शेतकर्‍यांना आपल्या अर्जात जमिनीचा प्लॉट नंबर सुद्धा सांगावा लागेल. मात्र हा नियम जुन्या लाभार्थ्यांसाठी नाही.

Advertisement

▪️ जर योग्य आणि प्रमाणित डेटा राज्य सरकारने केंद्राला पाठवला नसेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याच्या नावावर जमीन असावी.

▪️ कोणी शेतकरी शेती करत असेल पण त्याच्या नावावर शेती नसून वडील वा आजोबांच्या नावावर आहे, तर ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

Advertisement

▪️ दहा हजारपेक्षा जास्त पेन्शन (Pension) घेणार्‍या पेन्शन धारकास लाभ मिळणार नाही.

स्वत: करा चुक दुरूस्त

Advertisement

▪️ पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर दुरूस्त करू शकता. यासाठी तुम्ही https://www.pmkisan.gov.in/updateaadharnobyfarmer.aspx येथे क्लिक करा.

▪️ जर तुमच्या नावात चूक असेल किंवा अकाऊंट नंबर दुरूस्त करायचा असेल तर वेबसाईटच्या होम पेजवर तुम्ही Benificary status वर क्लिक करून ते दुरूस्त करू शकता.

Advertisement

तुम्ही लाभार्थी आहात का? चेक करा तुमचं नाव

▪️ अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in वर जा.

Advertisement

▪️ होमपेजवर Farmers Corner चा पर्याय दिसेल. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List पर्यायावर क्लिक करा.

▪️ नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. मग Get Report वर क्लिक करा व तुमच्या समोर पूर्ण यादी येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

Advertisement

▪️ असे समजू शकते हप्त्याचे स्टेटस पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा.

▪️ तेथे बेनिफिशिअरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला हप्त्याचे स्टेटस दिसेल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement