Take a fresh look at your lifestyle.

कॉफीच्या किमतीत विक्रमी वाढ, कशामुळे आली तेजी?

0

कंटाळवाण्या, निरस आयुष्यात तजेला, फ्रेशनेस आणण्याचे काम कॉफीचा एक घोट करतो. मात्र, अनेकांना हवाहवासा असणारा कॉफीचा घोट आता महाग होणार आहे.

गेल्या ४-५ महिन्यांत कॉफीच्या किंमती १० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत आणि पुढेही त्यात तेजी राहण्याची शक्यता आहे. मागणी वाढत असताना, दुसरीकडे उत्पादनात मोठी घसरण आल्याने कॉफीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. कॉफीच्या किमतीत सलग वाढ होत आहे.

Advertisement

‘एडलव्हाइस वेल्थ रिसर्च’च्या एका अहवालानुसार, कॉफी हंगाम 2021-22 मध्ये 300-330 बॅग (एका बॅगमध्ये ३० किलो) अरेबिका कॉफी, तर 140-160 लाख बॅग (एका बॅगेत ६० किलो) रोबस्टा कॉफीचे उत्पादन शक्य आहे. गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा हे 35-40 टक्के कमी आहे.

जगात कॉफीचे उत्पादन दशकाच्या नीचांकी पातळीवर येण्याची शक्यता आहे. जगात एकूण कॉफीउत्पादनाचा 70% हिस्सा ‘अरेबिका कॉफी’चा असतो.

Advertisement

कशामुळे आली तेजी?
गेल्या वर्षीच्या तुलनेत 35-40% उत्पादन घटून एका दशकाच्या नीचांकी पातळीवर येण्याची शक्यता आहे. अमेरिकेत ‘अनरोस्टेड कॉफी बीन्स’च्या ‘इन्व्हेंटरी’ 2015 पासून आतापर्यंत सर्वात नीचांकी पातळीवर आली आहे.

आयात-निर्यातीसाठी लागणाऱ्या कंटेनरच्या कमतरतेमुळे समुद्रामार्गे मालपुरवठ्याचा खर्च 10 वर्षांत उच्चांकी पातळीवर पाेहोचला आहे.

Advertisement

3 देशांमध्येच 66% कॉफी उत्पादन
ब्राझील – 36%
व्हिएतनाम -20%
कोलंबिया – 10%

भारतात कॉफीचा वापर वाढला
भारतात 2020 मध्ये प्रतिव्यक्ती वार्षिक सुमारे 95 ग्रॅम कॉफीचा वापर होतो आहे. या तुलनेत 2019 मध्ये प्रतिव्यक्ती 85 ग्रॅम कॉफीचा वापर झाला होता. घटलेल्या आकड्यामागचे कारण म्हणजे सध्या कॉफीचा वापर केवळ शहरांत आहे.

Advertisement

भारतात 50 % कॉफीची आयात ब्राझील आणि व्हिएतनामहून होते. तिथे भाव वेगाने वाढत आहेत. त्यामुळे कॉफी महाग होणे निश्चित असल्याचे ‘एडलव्हाइस वेल्थ’चे रिसर्च अॅनालिस्ट पराग शहा यांनी सांगितले.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement

Leave a Reply