SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कारणामुळे विमा कंपन्यांनी बंद केल्या कोविड पॉलिसी, आता माणसांच्या आरोग्याचं सुरक्षित कवच तुटणार का? जाणून घ्या…

कोरोना कवच पॉलिसींमध्ये (Corna Kavach Policy) मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागेल, हे कंपन्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. त्यामुळे आता त्यांनी या पॉलिसींचे नूतनीकरण बंद केले आहे. बऱ्याच विमा कंपन्यांनी विशेष कोविड मेडिक्लेम पॉलिसीही बंद केल्या आहेत. एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना विमा कंपन्यांनी आता कोविड पॉलिसी धोरण बंद केले आहे.

नवीन पॉलिसी घेण्याची इच्छा असलेल्यांना आणि जुन्या पॉलिसीचे नूतनीकरण करणाऱ्यांसमोर अडचणी आल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढल्याने क्लेम देखील वाढले होते. यामुळे विमा कंपन्यांच्या प्रचंड नुकसान झालं आहे.

Advertisement

आता अधिक सांगायचं झालं, तर कंपनीला मिळालेल्या रकमेच्या एकूण 150 टक्के रक्कम क्लेम (Claim) केल्यावर द्यावे लागतात. त्यामुळे नवीन पॉलिसी घेणाऱ्या आणि जुनी पॉलिसी रिन्यू करणाऱ्यांना आता समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम असा ली, कंपन्यांनी आता त्यांच्या सर्वसाधारण प्रिमियममध्ये वाढ केली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या भरवशावर असलेले लोकं एका नवीन समस्येत आले आहे.

देशभरात दररोज 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Wave) अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर (Death Rate) वाढल्याने समस्या आणखी बिकट झाली आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सांगितलं जातं असल्याने आणखी घातक आहे बोललं जात आहे. हे सरकारपुढे एक मोठं आव्हान असणार आहे.

Advertisement

कोरोना आल्यानंतर अनेक कंपन्यांनी नव्या कोविड हेल्थ पॉलिसी आणल्या. पण आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विमा कंपन्यांचा फायदा कमी आणि क्लेम जास्त होत असल्याने विमा कंपन्यांनी मात्र आता आपले दोन्ही हात वर केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement