SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सतर्क रहे! चीनचं रॉकेट पृथ्वीवर ‘येथे’ कोसळणार, अमेरिकन मिलिटरीचा अंदाज सांगतोय..

अंतराळात स्वत:चं स्पेश स्टेशन तयार करण्याच्या महत्वाकांक्षेतून चीनने पाठवलेलं एक रॉकेट आता संपूर्ण जगाची डोकेदुखी होऊन बसलं आहे, कारण अवकाशात निष्क्रिय आणि अनियंत्रित झालेलं चीनचं 5-बी (Chinese rocket 5B) रॉकेट पृथ्वीवर गर्दीच्या अर्थात राहत्या जागी कोसळणार असल्याच्या चांगल्याच चर्चा सुरु आहेत.

चीनचे रॉकेट पृथ्वीवर पडणार..

Advertisement

चीनचे हेच रॉकेट कधीही पृथ्वीवर पडू शकते असे सांगितले जात आहे. परंतु या रॉकेटचे काही भाग (अवशेष) पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी आणि कधी कोसळेल याविषयी अमेरिकन मिलिटरीने (American Military) अंदाज लावला आहे.

चीन देशाने 28 एप्रिल रोजी ‘तियानहे स्पेस स्टेशन’ (Tianhe Space Station) बनवण्याकरता सर्वात मोठे रॉकेट 5बी अवकाशात सोडले होते. एक मॉड्यूल घेऊन हे रॉकेट स्पेस स्टेशनमध्ये सोडण्यात आले.

Advertisement

मॉड्यूलला ठरवलेल्या (निर्धारित) कक्षेत सोडण्यात आल्यावर परत येताना त्याला नियंत्रित पद्धतीने जमिनीवर उतरणं अपेक्षित आहे. पण, आता चीनच्या स्पेस एजन्सीनं या रॉकेटवरील नियंत्रण सुटले आहे, अशी माहीती दिली आहे. शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे, की चीनचे हे रॉकेट कधी जमिनीवर कोसळेल सांगता येत नाही आणि जर कोसळलेच तर ते रहिवाशी भागात कोसळण्याची दात शक्यता आहे. रॉकेटची वेग लक्षात घेता यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. 10 मेपर्यंत रॉकेट जमिनीवर पडणार असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

कधी आणि कुठे कोसळणार रॉकेट?

Advertisement

चीनच्या रॉकेटला अमेरिकेची मिलिटरी रॉकेटच्या पृथ्वीवर येणाऱ्या भागाला ट्रॅक करत आहे. यानुसार त्यांनी हे रॉकेट कुठे कोसळेल याबाबत अंदाज लावला आहे. अमेरिकन मिलिटरीनं म्हटलंय की, “या रॉकेटचे अवशेष मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे अथवा संध्याकाळपर्यंत कोसळणार असल्याचं म्हटलं होतं.

हॉवर्ड विद्यापीठामधील ॲस्ट्रोफिजिस्ट जोनाथन मॅकडोवेल यांनी म्हटलं की, “ज्या भागात हे रॉकेट कोसळणार आहे. त्या भागाला मोठं नुकसानं होऊ शकतं. चीनचं एखादं रॉकेट पृथ्वीवर कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2020 मध्ये दुसऱ्या एका लॉंग मार्च रॉकेटचे अवशेष पश्चिम अफ्रिकन देशातील आयव्हरी कोस्ट येथील गावांमध्ये कोसळलं होतं. यामुळे या ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं. पण त्यावेळी कोणतीही व्यक्ती जखमी किंवा कोणाचाही मृत्यू झाला नव्हता”, असं ते म्हणाले.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement